सुनगांवात छुप्या मार्गाने हातभट्टी व देशी दारू विक्री सुरूच
ग्रामस्थांचा पोलीस स्टेशनला उपोषणाचा इशारा
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सूनगावात देशी दारू सह हातभट्टीची दारू सर्रास विकल्या जात असून, या दारूमुळे मोठ्यांसह लहान मुले ही दारू प्यायला लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गावातील शाळांच्या परिसरामध्ये अवैध स्वरूपात हातभट्टी देशी दारू यासह विविध ब्रँडच्या दारू मिळत असल्यामुळे या ठिकाणाहून नेहमीच दारू पिणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरही दारू विषयी आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊन विद्यार्थी दशेतील मुलांना दारूची सवय लागली आहे. तसेच गावामध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची संख्या वाढली असून कित्येकांचे संसार दारूमुळे उध्वस्त होत आहेत. असेच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ खुलेआम दारू विक्री वाढली होती याला त्रस्त होऊन येथील महिला व पुरुष यांनी आक्रमक होऊन गेल्या दि 3 शनिवार दिवशी पोलिसस्टेशन गाठले व निवेदन देऊन दारू बंदीची मागणी केली त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क होऊन सूनगावातील दारूबंदी केली परंतु हे दारूबंदी दोन तीन दिवस राहिल्या नंतर सनगाव येथे खुलेआम देशी दारू व हातभट्टीची दारू छुप्या मार्गाने विक्री होत आहे यालाच त्रस्त होऊन सुनगाव येथील ग्रामस्थांनी सूनगाव ग्रामपंचायतलाच दारूबंदीचा ठराव घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती त्यानुसार 29 12 2023 रोजी झालेल्या मासिक सभेत बहुमताने दारूबंदीचा ठराव पारीत करण्यात आला त्यानुसार सूनगाव ग्रामपंचायत कडून पोलिसस्टेशन जळगाव जा पोलीस अधीक्षक बुलडाणा दारूबंदी विभाग यांना सूनगाव ग्रामपंचायत ने पत्राद्वारे सूनगाव येथे दारूबंदी साठी योग्य ती कारवाई करावी करिता सादर केले आहे तरीही सुनगाव येथे देशी दारू व हातभट्टीची दररोज विक्री सुरूच आहे ती पूर्णपणे बंद करण्यात यावी अन्यथा 24 जानेवारीपासून पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे आज दिनांक 16 जानेवारी रोजी सुनगाव येथील नागरिकांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे निवेदन देते वेळी अयुब तडवी तुकाराम जाधव सचिन तायडे विनोद अंदुरकर संदेश वानखडे अमोल तायडे इतर गावकरी उपस्थित होते