मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री साहेब,
समृद्धी महामार्गवरील काम करनाऱ्या मजुरांना वेतन मिळेल का?
पाचशे मजुरांना पाच महिन्यापासून वेतन नाही,अंदाजे अडीच कोटी रुपये थकीत
प्रतिनिधी(सचिन मांटे).राज्यातील सर्वात महत्वाचा स्व. बाळासाहेब समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले… हा महामार्ग लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले.नागपूर मुंबई जवळ आले.रस्त्यावरून वाहने सुद्धा सुसाट धावायलाही लागल्या मात्र हा रस्ता तयार करणारे तढेंगावं कॅम्प मधील 500 मजुरांना त्यांची मजुरी तब्बल् 5 महिन्यापासून मिळाली नाही … हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुराचे परिवार हैरान झाले आहे… मजुराच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे… आता मजुरानी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात् हल्लांबोल सुरु केलाय…
रोडवेज सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनी मार्फत हजारो मजूर समृद्धी मार्गावर काम करीत होते, दिवसरात्र काम करून सुद्धा त्यांच्या घाम गाळलेल्या कामाचा मोबदला दिल्या जात नसल्याने 500 मजुरानी किनगावराजा पोलिसात तक्रार देण्यासाठी 15 किमी पायी जाऊन प्रयत्न केला मात्र राहेरी नदी पुलावर हा मजुराचा मोर्चा पोलिसांनी अडविला व कंपनीच्या जबाबदार व्यक्तीशी चर्चा करण्यात आली व पुढी आठवड्यात या मजुराच्या खात्यात त्यांचे वेतन दिल्या जाईल असे सांगण्यात आले..
मात्र मजुरानी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे जोपर्यंत आमच्या मजुरीचे पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका मजुराणी घेतली आहे….
कंपनीचे जे पी सिंग यांच्या चर्चा केली असता त्यांनी
एम एस आर डी सी ने अद्याप पर्यंत पैसे न दिल्याने मजुराचे पैसे देता आले नाही असे कबूल केले आहे, त्यामुळे या 500 मजुरांचे अडीच करोड रुपये देणे बाकी असल्याचे ही सिंग यांनी सांगितले आहे… मजुराणी थोडा धीर धरावा असे सिंग यांचे म्हणणे आहे.. पुढील आठवड्यात मजुरांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा होईल असे त्यांनी आश्वासन दिले आहे, आता समृद्धी महामार्गावर केलेल्या या 500 मजुरांना केव्हा मजुरी मिळेल याकडे मजुरांच्या कुटुंबंवाचे लक्ष लागले आहे…