सुनगाव ग्रामपंचायत चा कारभार रामभरोसे
ग्रामसेवकाची दांडी
विकासापासून गाव वंचित
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असून नेहमीच ही ग्रामपंचायत कुठल्या ना कुठल्या चर्चेत राहत असतेच सुनगाव ग्रामपंचायत ही मोठी असून या ठिकाणी व्हिडिओ दर्जाचा कायमस्वरूपी ग्रामसेवक अधिकारी पाहिजे परंतु आतापर्यंत दोन वर्षा अगोदर असलेले ग्रामसेवक चौधरी हे व्हिडिओ दर्जाचे असताना त्यांच्या बदली पासून अद्यापही सूनगावला प्रभारी ग्रामसेवक मिळाले आहेत तरी या ग्रामपंचायतीला पंचायत समिती प्रशासनाने व्हिडिओ दर्जाचा ग्रामसेवक अधिकारी देण्यात यावा अशातच ते दीड वर्षा अगोदर रुजू झालेले ग्रामसेवक प्रमोद खोद्रे हे जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत येथील प्रभार आहे व ते आपल्या प्रभारच्या दिवशी सुद्धा सुनगाव ग्रामपंचायतला हजर राहत नाही व त्यांचे हप्त्यातून दिवस कोणते हे सुद्धा ठरविलेले नाही त्यामुळे लोकांची कामे होण्यास व भरपूर लोक सुविधा पासून जसे घरकुल पासून वंचित राहिले आहेत लोकांना दाखले ग्रामसेवक यांचे प्रभाराचे दिवस सुनगाव ग्रामपंचायतला कोणते ठरविले आहेत हे त्यांनाच माहिती आहेत व ते किती वाजता ग्रामपंचायत ला येतात कधी दीड वाजता तर कधी तीन वाजता ग्रामपंचायतला येतात नेमके साहेब किती वाजता ग्रामपंचायतला येणार याची कोणतीच वेळ साहेबांनी ठरविलेली नाही त्यामुळे साहेब कधी येतील याची वाट पाहत शेवटी लोक त्रासून जात आहेत त्यामुळे लोकांची कामे होण्यास अडचण निर्माण होत आहे तरी या ग्रामसेवक साहेबांना कुठलीच मर्यादा व वेळेचे बंधन नाही का अशी चर्चा सूनगाव येथील नागरिकांमध्ये होत आहे तरी या गंभीर समस्ये कडे लोकप्रतिनिधींनी व पंचायत समिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे व सुनगाव ग्रामपंचायत ही विकास कामांच्या बाबतीत सध्या उदासीन झालेली आहे व सूनगाव ग्रामपंचायत चे कर वसुली हे सुद्धा थकलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व गावातील नाल्या साफसफाई हाय मास्ट दुरुस्ती पथदिवे दुरुस्ती इत्यादी कामे रखडलेली आहेत
