सुनगांवात छुप्या मार्गाने हातभट्टी व देशी दारू विक्री सुरूच
त्रस्त होऊन ग्रामपंचायतला दारूबंदीचा ठराव घेण्यासाठी ग्रामस्थांनी दिले निवेदन
गजानन सोनटक्के
जळगाव जा
सूनगावात देशी दारू सह हातभट्टीची दारू सर्रास विकल्या जात असून, या दारूमुळे मोठ्यांसह लहान मुले ही दारू प्यायला लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गावातील शाळांच्या परिसरामध्ये अवैध स्वरूपात हातभट्टी देशी दारू यासह विविध ब्रँडच्या दारू मिळत असल्यामुळे या ठिकाणाहून नेहमीच दारू पिणाऱ्यांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरही दारू विषयी आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही विपरीत परिणाम होऊन विद्यार्थी दशेतील मुलांना दारूची सवय लागली आहे. तसेच गावामध्ये अवैधरित्या दारू विकणाऱ्यांची संख्या वाढली असून कित्येकांचे संसार दारूमुळे उध्वस्त होत आहेत. असेच बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ खुलेआम दारू विक्री वाढली होती याला त्रस्त होऊन येथील महिला व पुरुष यांनी आक्रमक होऊन गेल्या दि 3 शनिवार दिवशी पोलिसस्टेशन गाठले व निवेदन देऊन दारू बंदीची मागणी केली त्यामुळे पोलीस प्रशासनाने सतर्क होऊन सूनगावातील दारूबंदी केली परंतु हे दारूबंदी दोन तीन दिवस राहिल्या नंतर सनगाव येथे खुलेआम देशी दारू व हातभट्टीची दारू छुप्या मार्गाने विक्री होत आहे यालाच त्रस्त होऊन सुनगाव येथील ग्रामस्थांनी सूनगाव ग्रामपंचायतलाच दारूबंदीचा ठराव घेण्याची मागणी आज निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर अयुब तडवी तुकाराम जाधव त्र्यंबक इंगळे मिलिंद इंगळे राहुल तायडे बाळू हिवराळे इत्यादी ग्रामस्थांच्या सह्या आहेत