Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

निवडणूक प्रशिक्षणासाठी २४ कर्मचारी गैरहजर, निलंबनाची टांगती तलवार, तहसीलदार सावंत यांनी दिला 24 तासाचा अल्टिमेटम

निवडणूक प्रशिक्षणासाठी २४ कर्मचारी गैरहजर, निलंबनाची टांगती तलवार, तहसीलदार सावंत यांनी दिला 24 तासाचा अल्टिमेटम

सिंदखेड राजा(प्रतिनिधी.सचिन मांटे)
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आयोजित प्रशिक्षणास मतदान अधिकारी म्हणून नेमणूक केलेली २४ कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याने निवडणूक विभागाने कठोर पावले उचलत २४ तासाच्या आत आपले म्हणणे प्रत्यक्ष हजर राहून मांडावे अन्यथा आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सक्त इशारा निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुनील सावंत यांनी या दांडी बाजार कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे या कर्मचाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार उभी आहे
निवडणूक प्रक्रिया सुलभ पार पाडावी यासाठी ४२० कर्मचाऱयाना दोन टप्प्यांमध्ये दिनांक १२ प्रशिक्षण देण्यात आले मात्र मात्र या प्रशिक्षणातील तब्बल २४ नेमलेले कर्मचारी गैरहजर राहिले याची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी सुनील सावंत यांनी या दांडी बहादर कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात कसूर केल्याबद्दल लोक प्रतिनिधित्व अधिनियम अनुसार कारवाई का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस रामेश्वर काळुसे शिक्षक डोरव्ही ,सतीश पोंधे शिक्षक साखरखेर्डा ,मिलिंद थीगळे शिक्षक देऊळगाव कोळ ,अशोक उगलमुगले शिक्षक चिंचोली जहागीर, राजेश शिंदे मुख्याध्यापक शेंदुर्जन, साजुद्दीन काझी शिक्षक साखरखेर्डा ,गजेंद्र देशमुख शिक्षक दुसरबीड, दिलीप राठोड शिक्षक वडाळी ,प्रल्हाद सानप शिक्षक शेंदुर्जन, गणेश शिंगणे मुख्याध्यापक दरेगाव, भानुदास चेके शिक्षक खैरव, गंगाधर खरात शिक्षक रूम्हना, सुरज कुरंगळ शिक्षक धांदरवाडी, शंकर उगलमुगले शिक्षक जागदरी, अमोल केळकर शिक्षक सिंदखेड राजा, रवींद्र माथे शिक्षक साखरखेर्डा, किरण मगर लेखाधिकारी पस सिंदखेडराजा, नितीन मोरे शिक्षक मोहाडी, श्रीकृष्ण पडघान शिक्षक गोरेगाव, मो आरिफ मो शफी मुख्याध्यापक साखरखेर्डा, विठ्ठल टाकळे कृषी सहाय्यक सिंदखेड राजा , अल्ताफ हुसेन मो हनीफ शिक्षक दुसरबीड ,मनोज कुमार दराडे शिक्षक देवखेड, रमेश हरदास शिक्षक शिवनी टाका आदींना देण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ते प्रत्यक्ष हजर राहून आपला जवाब काय देतात यावर पुढील कारवाई होणार आहे या संदर्भात पुढील अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे
बॉक्स
नोटीस बजावलेले बहुतेक कर्मचारी पवित्र असे शिक्षण दान करणारे शिक्षक आहेत मात्र यातील अनेक शिक्षक राजकीय पक्षाशी सलग्नित संलग्नित आहे
निवडणूक विभागाच्या कामासाठी नेमणूक केलेले अधिकारी हे बहुतांश शिक्षक असून यातील दोन कर्मचारी एक पंचायत समितीमध्ये तर एक कृषी विभागात कार्यरत आहे विशेष म्हणजे नोटीस बजावलेल्या यातील काहीजण त्यांचे नातेवाईक ग्रामपंचायत च्या निवडणुकीमध्ये उभे आहेत काहीजण राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने चौकशी करताना त्यामुळे राजकीय दबाव येऊ शकतो किंवा काही कर्मचारी आपले नातेवाईक जवळचे नातेवाईक किंवा स्वतःआजारी असल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडून आपण या कारणासाठी गैरहजर असल्याचे सांगू शकतात त्यामुळे याची सखोल चौकशी घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी आणि कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निवडणूक विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे

Sachin
Leave A Reply

Your email address will not be published.