सिंदखेडराजा ( प्रतिनिधी,सचिन मांटे ) – सिंदखेडराजा तालुक्यातील तीस ग्रामपंचायत सरपंच पदाचे १५५ अर्ज वैध तर सदस्यपदाचे १४ अर्ज बाद ठरले. काल सहा डिसेंबर रोजी सदर अर्जाची छाननी झाली सर्व १५५ जणांचे अर्ज ६१६ सदस्यांचे अर्ज वैद्य ठरले यातील ३० ग्रामपंचायतीच्या अर्जाची ती पुढील प्रमाणे तारशिवनी १, शिवनी टाका १ आडगाव राजा २ हिवरखेड एक तढेगाव २,शिंदी १, गुंज २ ज्यांचे अर्ज बाद झाले.
अनेकांनी मागील वर्षी निवडणुकीचा हिशोब न दिल्यामुळे त्यांच्या अर्ज बाद झाले तर काहीच जात प्रमाणपत्र आणि अथवा पावती नसल्यामुळे,७ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे दुपारी चिन्ह वाटप होईल तालुक्यातील सर्वच निवडणुकीमध्ये रंगतदार भर पडणार आहे जवळपास सर्वच गावांमध्ये अटीतटीच्या लढती आहे निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर,नायब तहसीलदार वराडे, नायब तहसीलदार धोंडारकर निवडणूक विभागाचे पुरुषोत्तम हांडे काम करीत आहेत.