सूनगाव येथील आशिषसिंह राजपूत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद
:दि- 26 तालुक्यातील सूनगाव येथे राहणारे युवा उद्योजक आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत यांना नुकतेच पुणे येथे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले .
सविस्तर वृत्त असे की जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे राहणारे आशिषसिंह गोविंदसिंह राजपूत हे कॉस्मेटोलॉजी मध्ये एम. टेक. असून कॉस्मेटिक सायन्सच्या फिल्डमध्ये ते सध्या देशभरात प्रसिद्ध आहेत. त्यांचा सौंदर्य प्रसाधनांसाठी लागणारा कच्च्या मालाचा उद्योग सध्या भरभराटीस आलेला आहे. अतिशय ग्रामीण भागातून व बिकट परिस्थितीतून शिक्षण घेत प्रथम एक वर्ष नोकरी करत व नंतर लगेच स्वतःचा व्यवसाय उभा करत आज या क्षेत्रात आशिष सिंह देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, दिल्ली व देशाबाहेरही सौंदर्यप्रसाधन उत्पादने पाठवल्या जात आहेत. दिनांक 26 ला संध्याकाळी पुणे
स्व. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित एका शाही कार्यक्रमात जगप्रसिद्ध सरपंच पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार आशिषसिंह यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी मंचावर कृषिरत्न डॉक्टर संजीव माने, योगातज्ञ डॉक्टर प्रज्ञा पाटील,
व इतर मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे हे असून महाराष्ट्र व गोवा या ठिकाणहून विविध क्षेत्रातील विशेष प्रगती करणारे युवा उद्योजक व तज्ञ यांना नॉमिनेट करत यातून एका तज्ञ समितीने हे पुरस्कार साठी योग्य व्यक्तींची निवड केली याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना आशिषसिंह यांनी तरुणांना बारावी सायन्स झाल्यानंतर कॉस्मेटिक्स क्षेत्रात बी टेक व एम टेक हे शिक्षण घेऊन या क्षेत्राकडे वळण्याची विनंती केली.
ते समाजकार्यात अग्रेसर असुन मोटिवेटर यूटुबर आहेत. आपल्या यशाचे श्रेय ते आपले कुटुंबीय व मित्र यांना देतात.याप्रसंगी सर्व स्तरातून आशिषसिंह यांचे कौतुक होताना दिसत आहे.