गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी – जळगाव जामोद तालुक्यात दिनांक १४ मे रोजी तरोडा बु! शेत शिवारामध्ये १० मृत काळवीट आढळले होते. त्याविषयी दिनांक १४ मे रोजी नियमानुसार आरोपीवर कारवाई करून वन गुन्हा ६७८/१६९२७ जारी केला होता. तसेच वन गुन्ह्यासंदर्भात दिनांक १५ मे रोजी गावातील परिसरात फिरून चौकशी केली असता आणखी तीन काळवीट मृत अवस्थेत आढळून आले होते त्या विषयी दिनांक १५ मे रोजी वन गुन्हा क्रमांक ६७८/१६९२८ जारी करून वनविभाग त्या दिवसापासूनच आरोपीच्या शोधात होते त्या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी कटारिया जळगाव जामोद व त्यांचे वनकर्मचारी या प्रकरणी तपास करीत होते सदर प्रकरणातील मुख्य आरोपी चा छडा लावण्यात वनविभाग यशस्वी झाले त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली होती माहितीवरून वनपरिक्षेत्राधिकारी बि.डी कटारिया व त्यांचे वन कर्मचारी यांनी सदर आरोपीचा पाच दिवसांमध्येच शोध लावला सदर आरोपी मुख्य आरोपी हा हनवतखेड येथील राधुसिंग छत्तरसिंग डावर याच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे त्याचा कबुलीजबाब घेऊन त्याला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा दिनांक २४ मे पर्यंत वन कस्टडी रिमांड देण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पुढील कालावधीत करण्यात येईल संपूर्ण प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक बुलढाणा अक्षय गजभिये आर आर गायकवाड सहाय्यक वनरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी कटारिया यांच्यासह वनकर्मचारी श्री.जी दंडे,पी.जी.सानप वनपाल,व्हेरोडे,पर्वते,खेडकर, बुधवत,ताडे,कु.फळके,फड,बारेल,जुमडे,चालक गणेश तराळे,महेंद्र तायडे यांनी परिश्रम घेतले.
Related Posts