सुनगावला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा या मागणीसाठी विनोद इंगळे यांनी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..
सुनगावला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा या मागणीसाठी विनोद इंगळे यांनी दिले गटविकास अधिकारी यांना निवेदन..
गजानन सोनटक्के
जळगांव जा.
मागील वर्षीपासून सुनगाव गावाला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारीच नसल्यामुळे गावातील विकास कामे खोळंबली असून त्यातच कर वसुलीही होत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार व इतरही कामे होत नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सुनगाव गावाला मागील वर्षापर्यंत तत्कालीन ग्रामविकास अधिकारी टिजी चौधरी यांनी विकासात्मक दृष्ट्या खूप पुढे नेले होते. तसेच गावातील कर संकलनही खूप होत होते. ते गेल्यापासून गावाला पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी नसल्यामुळे येथील कर संकलन होत नसून, विकास कामे खोळंबली आहेत. त्यातच नव्यानेच प्रभारी ग्रामसेवक म्हणून रुजू झालेले खोद्रे यांच्याकडे आधीच खूप मोठा भार असून सुनगावला ते पूर्ण वेळ देऊ शकत नसल्यामुळे गावामध्ये विकास कामासह कर संकलन होत नसून त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुद्धा पगार वेळेवर होत नाहीत तसेच गावामध्ये व्यवस्थित रित्या सफाईची कामे होत नसून जिथे बघावे तिथे कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच सध्या ग्रामपंचायतचा कारभार नियोजन शून्य असून त्यातच ग्रामपंचायतीचे दाखले वेळेवर मिळत नसून नागरिकांची कामे ही वेळेवर होत नाहीत. त्यामुळे सुनगाव येथील विनोदी इंगळे यांनी गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी व्हिडीओ दर्जाचा मिळावा या मागणीसाठी गटविकास अधिकारी यांना दिनांक 4 नोव्हेंबर रोजी निवेदन देत मागणी केली आहे. त्यांची ही मागणी रास्त असून गटविकास अधिकारी यांनी सुनगाव गावाला पूर्णवेळ ग्रामविकास अधिकारी द्यावा जेणेकरून गावाच्या विकासाला हातभार लागेल.