Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शिकवताना नियंत्रण सुटल्याने कार विहिरीत कोसळली पत्नी व मुलीचा मृत्यू तर शिक्षक गंभीर जखमी

सिंदखेडराजा:- दिवाळीची सुटी असल्‍याने शिक्षक आपल्या पत्‍नीला कार शिकवित होते. या दरम्‍यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्‍त्‍याच्‍या बाजूला जात विहिरीत कोसळली. देऊळगावराजा येथे आज दि. ३ नोव्हेंबर, गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पत्‍नी व मुलीचा मृत्‍यू झाला असून शिक्षकास दवाखान्‍यात भरती करण्यात आले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील डोरवी येथील मूळ निवासी व शिक्षक म्हणून नोकरीत असलेले अमोल मुरकुट हे देऊळगावराजा येथील रामनगरमध्ये राहतात. पत्नी स्वाती मुरकुट यांना कार शिकवत होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी सिद्धी मुरकुट ही सुद्धा सोबत होती. दरम्यान कार शिकवित असताना चिखली रोडवर जात असताना कार वरील ताबा सुटला. यानंतर कार सरळ ७० फुट खोल विहिरीमध्ये पडली.

झालेल्‍या अपघातात अमोल मुरकुट खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. मात्र स्वाती मुरकुट व मुलगी सिद्धी मुरकुट यांचा मात्र पाण्यामध्ये मृत्यू झाला आहे. अमोल मुरकुटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अग्निशमन, पोलीस दल व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्वाती मुरकुट व सिद्धी यांचा मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

विहिरीतील पाणी काढणे सुरु असतांनाच, कारचा शोध घेतो म्हणत एका युवकाने विहिरीत उडी मारली, मात्र त्यानंतर तो वर आलाच नसल्याची चर्चा आहे.

Murkut
Leave A Reply

Your email address will not be published.