आमदारांनी ५० खोक्यांचा कलंक मिटवण्यासाठी ही गोष्ट करावीच!- अँड नझेर काजी
सिंदखेड राजा : राज्यांतील सत्तांतरामधील आमदारांनी स्वतः नार्को टेस्ट करून महाराष्ट्रातील नागरिकांना पडलेल्या ५० खोक्यांचा प्रश्नांचे निराकरण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) बुलडाणा (Buldana) जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी सिंदखेड राजा येथे केली.
या वेळी काझी म्हणाले,
सत्तांतरामधील आमदार गुजरात, गुहावटी, गोवा फिरून येवून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्यातील सर्वाना एक प्रश्न सतावत आहे तो म्हणजे ५० खोक्यांचा, मात्र या संदर्भात अद्यापही कोणतेही उत्तर मिळाले नाही. यामुळे लोकशाहीचे मूल्य पायदळी तुडवली जात आहे का? आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
लोकशाहीची मूल्य मजबूत करण्यासाठी या सर्व प्रश्नाचे उत्तर राज्यातील नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. नार्को टेस्ट ही किचकट प्रक्रिया असून स्वतःच्या पूर्व संमतीशिवाय ती होऊ शकत नाही, त्यामुळे सत्तांतर केलेल्या आमदारांनी स्वतःहून समोर येऊन नार्को टेस्ट करून जनतेच्या मनामध्ये असलेल्या संभ्रम दूर करावा, असा सल्ला काझी यांनी आमदारांना दिला.
काही दिवसापूर्वी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये ५० खोक्यावरून झालेल्या वादामुळे खोक्यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच आमदार बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उत्तर देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर दोघांमधील वाद हा मिटवण्यात आला. मात्र, ज्या विषयावर हा वाद सुरू झाला होता त्या वादाच्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
५० खोक्यांच्या विषयावर कोणीही उत्तर देत नाही. त्याचे खंडन करत नाही. लोकशाहीची मूल्ये मजबूत होण्यासाठी मूल्य टिकली पाहिजेत यासाठी यांचा उलगडा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ५० खोक्यांचा विषय अधिवेशन काळातही गाजला होता. त्यामुळे आमदारांनी स्वतः समोर येऊन नार्को टेस्ट करावी, त्यामुळे सत्य समोर येईल.
या मुळे नागरिकांच्या मनामध्ये असलेला संभ्रम दुर होईल, असेही त्यांनी सांगितले. नार्को टेस्टच्या वेळी संबधित पक्षाचे प्रतिनिधी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींनाही उपस्थित ठेवल्यास महाराष्ट्राला त्याचे उत्तर मिळेल, त्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, असे काझी यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, तालुका अध्यक्ष सतीश काळे,शहराध्यक्ष सीताराम चौधरी, उपनगराध्यक्ष विजय तायडे, जगन सहाणे, यासिन शेख, मंगेश खुरपे, नरहरी तायडे, नितीन शेळके, अमोल भट, आरिफ चौधरी यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.