. राष्ट्रवादी शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सभेने बुलढाणा जिल्ह्यातील पाडळी ( शिंदे ) येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. आद. शंकर अण्णा धोंडगे यांची उपस्थिती होती. त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नांदेड जिल्हाप्रमुख आद. दत्ता पवार हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना श्री दत्ता पवार म्हणाले की, राज्यातील शेतकरी परतीच्या पावसामूळे झालेल्या अतिवृष्टीमुळे अतिशय हवालदिल झाला आहे. राज्यसरकारने सरसकट सर्व शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहीजे. असे श्री पवार म्हणाले. तर विदर्भ व मराठवाड्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाला एफ आर पी चा कायदा लागू करावा. अशी मागणी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष श्री शंकर अण्णा धोंडगे यांनी केली. सदर शेतकरी मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत असतांना विदर्भ, मराठवाडा व खान्देशातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन श्री धोंडगे यांनी वरील मत व्यक्त केले. तर विदर्भ मराठवाडा या भागातील राजकीय, सामाजिक परिस्थितीचा आढावा घेत शेतकाऱ्यांनीसुद्धा सध्या स्वतःच्या हितासाठी सैरभैर असलेलं राजकारण व बिनकामच्या चर्चेत सहभाग न नोंदवता अनेक निकष अटी, अडथळे ओलांडत अवाजवी मदतीसाठी लक्ष देत बसू नये. त्यापेक्षा आपल्या शेती या व्यवसायाला फायद्याचे करण्यासाठी संघटित होऊन अशा नाकर्ते सरकारच्या विरुद्ध आपला आवाज बुलंद केला पाहिजे असेही श्री धोंडगे म्हणाले. तसेच माजी कृषीमंत्री खा. शरद पवार यांचे शेती व शेतकऱ्यांच्या विषयीचा त्यांच्या कार्यकाळातील कार्याचा गौरव करत श्री धोंडगे यांनी पवार साहेबांचे आभार मानले. त्याच बरोबर श्री शरद पवार यांचे कृषी विषयक असलेले प्रगल्भ विचारच या देशातील शेतकऱ्याला विक्रमी उत्पन्न मिळवून देऊ शकतात. व विदर्भ, मराठवाडा, आणि खान्देशातील शेतकऱ्याला कापूस व सोयाबीन हेच दोन पिके वाचवू शकतात. असेही श्री धोंडगे म्हणाले. सदर शेतकरी मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राष्ट्रवादी किसान सभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री राजीव पाटील जावळे यांनी केले.
तर या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी किसान सभेचे बुलढाणा जिल्हाउपाध्यक्ष श्री शिवानंद शिंदे यांनी केले होते. या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्याचे किसान सभेचे जेष्ठ नेते बबनराव गवारे,हे देखील आवर्जून उपस्थित होते. तर पाडळी पंचक्रोशीतील शेतकरी, बीजोत्पादक शेतकरी तथा किसान सभेचे कार्यकर्ते यांच्यासह नितीन शिंगणे,गजानन पवार, पुरुषोत्तम पडघन, गजेंद्र शिंगणे, गणेश बुरकुल, अमोल भट, सोपानराव चेके, यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते. शब्द संकलन बंडू जावळे जालना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 9860987698