सिंदखेड राजा – ज्या उद्देशाने आपण मातृतीर्थ प्रतिष्ठान स्थापन केले ते म्हणजे समाजातील वंचीत,गरजू,बेघर, मनोरुग्ण यांचा सांभाळ करणाऱ्या विविध संस्थांना मदत करता यावी व त्या निराधारांना सुद्धा आपल्या सारखे राहता यावे हाच मुख्य हेतू व उद्देश….
याच उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मातृतिर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी फराळासाठी आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दात्यांनी मदत केली त्याच मदतीतून मातृतिर्थ प्रतिष्ठानच्या वतीने
▫️सेवासंकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ,
▫️विहान प्रकल्प बुलढाणा,
▫️दिव्य सेवा प्रकल्प वरवंट बुलढाणा,
▫️नित्यानंद प्रकल्प हिवरा आश्रम येथील गरजू,अनाथ,बेघर व मनोरुग्णांसाठी दिवाळी फराळाच्या रूपाने चिवडा,शंकरपाळे,बुंदी, चकली इत्यादी 250 किलो फराळाचे पदार्थ दिनांक 22 ऑक्टोबर रोजी मातृतीर्थ प्रतिष्ठानचे सदस्य डॉ.शिवानंद जायभाये,श्री खुशालराव नागरे,श्री दत्तात्रय भोसले,श्री सुनील तायडे,श्री साईनाथ मांटे,श्री संदीप घिके यांनी पोहोच केले…
दिवाळी फराळ वाटपासाठी मातृतिर्थ प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या दात्यांनी आर्थिक मदत केली खरेतर त्यांच्यामुळेच या वंचितांच्या मुखात दिवाळी निमित्त गोड घास भरवता आले.त्या बद्दल सर्व दात्यांचे मनपूर्वक धन्यवाद. व सर्वांना मातृतिर्थ प्रतिष्ठान तर्फे दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…