ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
गजानन सोनटक्के जळगाव जामोद
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ही मोठी ग्रामपंचायत असताना या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत मध्ये चालठाना उसरा व अन्य छोटी छोटी खेडे येत आहेत त्यामुळे या ग्रामपंचायती कर वसुली ही मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या सुनगाव येथे ग्रामसेवक हे प्रभारी असल्या मुळे जवळपास एक ते दीड वर्षापासून वसुलीही अत्यल्प झालेली आहे त्यामुळे ग्रामपंचायत खर्च हा सामान्य फंडातून धूमधडाक्याने होत आहे त्यामुळे सामान्य फंडाचा कोश हा रिकामा झाला आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन पाच ते सहा महिन्यांपासून थकीत झाले आहे त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळी अंधारात जाते की काय असा नाराजीचा सूर आहे विशेष म्हणजे मागच्या एक-दीड वर्षा अगोदरची वसुली पाहता ही चांगल्या प्रमाणात होती त्यावेळेस कार्यरत असणारे टी जी चौधरी यांची कर्मचाऱ्याला घेऊन गावात वसुली करणे हे ध्येय होते व त्यांच्या कार्यकाळात वसुली मोठ्या प्रमाणावर होती परंतु आता सध्या ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचे वसुलीकडे दुर्लक्ष झालेले आहेत त्यामुळे सामान्य फंडात रक्कम शिल्लक नसल्यामुळे ग्रामपंचायतीला तालुक्यातील ग्रामपंचायत पेक्षा जास्त कर्मचारी म्हणजेच जास्त कर्मचारी दहा ते बारा कर्मचारी आहेत त्यांचे वेतन हे पाच सहा महिन्यांपासून थकीत आहे व सामान्य फंडात पैसे नसल्यामुळे गावातील सामान्य फंडातून करण्यात येणारी कामे जसे नाली साफसफाई दिवे दुरुस्ती अशी बरीच कामे सुद्धा रखडली आहेत तरी या परिस्थितीकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे