अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात, कुठलेही निकष न लावता सरसकट नुकसान भरपाई द्या
आमदार डॉ,शिंगणे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी.
सिंदखेड राजा(प्रतिनिधी सचिन मांटे) सिंदखेडराजा तालुक्यात ११ ऑक्टोंबर रोजी पावसाने सोयाबीन,कपाशी, या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे, आईन आईन सोयाबीन काढण्याचे सोयाबीन काढण्याचे वेळेला अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे, बळीराजा संकट आल्याने सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार डॉक्टर शिंगणे यांनी १२ ऑक्टोंबर रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तालुक्यात सर्वत्र पाऊस झालेला आहे सॉरी अतिवृष्टी झाली त्यामुळे तहसीलदार सुनील सावंत तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड ला सोबत घेऊन डॉक्टर शिंगणे यांनी भागाची पाहणी केली कपाशी व सोयाबीन चे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी सूचना अधिकाऱ्यांना आमदार डॉक्टर शिंगणे यांनी दिल्या.