राहेरी पूल,मुंबई नागपूर हायवे पर्यायी मार्ग डाकलाईन रस्त्याते खड्डे
सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे) मुंबई-नागपूर महामार्ग हा सिंदखेडराजा तालुक्यातुन जातो या महामार्ग ला जोडणारा राहेरी नामक पूल हा दुरुस्ती कारणास्तव शासनाने बंद केला आहे,म्हणुन या पुलावरची वाहतूक पर्यायी मार्ग म्हणुन डाकलाईन नावाने जुना रस्ता प्रशासनाने सुरु केलाय नदीवर पूल व पर्यायी मार्गचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले,काम पूर्ण होऊन अंदाजे आठ महिने पूर्ण झाले असतील पण सद्या रस्त्यावर मोठं मोठ्या खड्याचे साम्राज्य तयार झाले आहे,दिवस सध्या पावसाचे असून खड्यात पाणी साचल्यास दुचाकी किंवा चारचाकी धारकांना अंदाज लावने कठीण होत आहे यातूनच लहान मोठे अपघात होत असतात रस्त्यावर व रस्ताच्या कडा पाहता कामाची स्तिथी व दर्जा यावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे? एक ऋतू न सहन शकलेला हा रस्ता खचतोय या कामाची रस्त्याची बनावट निकृष्ट दर्जाची आहे प्रशासनाने वेळीच पाउल उचलून कंत्राटदार वर कार्यवाही करावी अशी मागणी व चर्चा नागरिकाकडुन होत आहे.