पोळा सणाला बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने थाटली
गजानन सोनटक्के
जळगाव जामोद
तालुक्यातील सूनगाव जामोद परिसरात ठीक ठिकाणी बैलपोळा सणाला बैलाला सजविण्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची दुकाने थाटली असून सजावट करण्यासाठी साहित्या
मध्ये प्रत्येकी 20 ते 25 रुपयांनी वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या तीन वर्षापासून जगावर कोरोनाचे सावट होते. मात्र कोरोनाचे सावट कमी झाल्याने सर्वत्र सन उसात साजरे होत आहेत. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शेतकऱ्यांचा आवडता सण म्हणजे बैलपोळा तोही उत्साहात साजरा होईल असे चित्र दिसत आहे. यावर्षी काही प्रमाणात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा आनंदात असून बैलपोळ्याला आपल्या सर्जा राजा बैलाला सजविण्यासाठी सर्वत्र सूनगाव जामोद परिसरात तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जा तालुक्यातील सूनगाव जामोद परिसरात ठीक ठिकाणी बैलाला सजविण्यासाठी लागणारे साहित्याचे दुकाने सजले आहेत. बैल म्हणाला की शेतकऱ्यांचा अपार कष्ट करणारा खरा मित्र आहे. वर्षभर शेतीत काम करणाऱ्या सर्जा राजाला सजवत पूजा करून त्यांना पुरणपोळी खाऊ घालायचे महत्त्वाचे म्हणजे पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते परंतु गत गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या सावता शासनाच्या निर्बंधात हा सण साजरा करावा लागत होता. परंतु यावर्षी ते निर्बंध उठल्याने बळीराजा खूप आनंदात दिसून येत आहे. बैलांना सजविण्यासाठी लागणारे साहित्य दुकान गोल्डन शहरात सजली असून पैंजण, केसाळी मणी, मला, पिवळी चैन, शेंदुरी कलर, रेबीन, चाळपट्टा, शिंग गोंडे, नाकातील व्यसन, घुंगरू बासिंग, कवडी माळा, माठूळ कासरे, आधी बैलांना सजवण्यासाठीच्या वस्तूंचा यात समावेश आहे. तसेच बाजारात माती पासून बनवलेले प्लास्टिकचे बैल देखील विक्रीसाठी आले आहेत. मात्र यावेळी सजावट साहित्यामध्ये किमतीत 20 ते 30 रुपयांनी वाढ झाल्याचे चित्र आहे.