तढेगाव पाठोपाठ निमगाव वायाळ नदीपात्रात पोकलेनच्या सह्याने वाळू उपसा
महसूल प्रशासन कार्यवाही करणार का?
सिंदखेडराजा(सचिन मांटे).सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या काही महिन्यापूर्वी तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले त्यात प्रामुख्याने
हिवरखेडपूर्णा,तढेगाव,निमगाव,साठेगाव याठिकाणचे लिलाव बड्या बोलीने झाले नियोजित हद्द महसूल प्रशासनकडून देण्यात आली पण यातील निमगाव वायाळ येथील घाटात चक्क पोकलेन ने वाळू उपसा केला जात आहे व पोकलेन ने वाळू उपसा केला जात असून वाळू वाहतूक करणारे डम्पर भरून दिले जातात,पोकलेन ने वाळू उपसा हा मर्यादाबाहेर होत आहे यात बांधलेली कडे हे ढसाळुन पडत आहे अशाप्रकारचे नुकसान होत आहे अशीच जर वाळू उपसा सुरु राहत गेला तर पाण्याचा प्रश्न उपस्थित होईल अशी परिस्थिती सध्या निमगाव वायाळ घाटात आहे याअगोदर,तढेगाव घाटात जर असा उपक्रम या घाटात सूरु होता यानंतर निमगाव वायाळ पोकलेनच्या साह्याने वाळू उपसा सुरु आहेत बाकीच्या घाटाकडे काय स्तिती असेल… नदीपात्रात पोकलेन वाळू उपसा करण्यासाठी महसूल प्रशासनाने मान्यता दिली आहे का?
नसेल तर महसूल प्रशासन कार्यवाही करणार का?
असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.