Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

७ लाखाचा कानफोडीचा ‘लक्ष्या’ किनगावराजातील वानखेडेंच्या दावणीला

किनगावराजा दि.11 ( प्रतिनिधी आनंद राजे ) ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या शंकरपटावरील गत ७ वर्षांपासूनची असलेली बंदी न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात उठवली अन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या या विशेष आवडीच्या खेळाच्या अर्थकारणानेे वेग धारण केला असल्याचे दिसून येत आहे.

shankarpat

याचेेच उदाहरण म्हणजे शंकरपट खेळावर अन पटांच्या बैलावर जीवापाड प्रेम असलेल्या किनगावराजातील गजानन वानखेडे यांनी तब्बल ७ लाख ११ हजार रुपये किंमत देऊन मराठवाड्यातील मंठा तालुक्यातील कानफोडी गावातील रमेश राठोड यांच्या ‘लक्ष्या’ नावाच्या बैलाची खरेदी करून त्याला आपल्या दावणीला बांधून वेसण घातली आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सुसाट वेगाने ‘स्पीड किंग’ अशी ख्याती मिळवणाऱ्या लक्ष्याचे आगमन वानखेडे यांनी किनगावराजात केल्याने या परिसरातील शंकरपट प्रेमींच्या आनंदाला उधाण आलेआहे.किनगावराजातील शंकरपटाचे खास शौकीन असणारे गजानन वानखेडे हे स्वतः पोलीस खात्यात नोकरीला आहे तर त्यांच्या पत्नी आरोग्य विभागात कार्य करतात.मोठा मुलगा शिक्षक तर लहान मुलगा हवाई दलात नोकरीस आहे.असा ज्याला आपण ‘वेल सेटल’ परिवार म्हणतो तसा त्यांचा परिवार आहे.असे वैभव प्राप्त असल्यावर आरामशीर जीवन जगू शकणाऱ्या वानखेडे यांना मात्र बैलगाडा शर्यतीतच रस आहे.आमचे पूर्वज नंदीचे भक्त असल्याने पिढीजात आम्हाला हा छंद असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

त्यांच्या या आवडीला कुटुंबातील सर्वांचीच मनापासून साथ आहे.तसे पाहिले तर शर्यतीचे बैल सांभाळणे सोपी गोष्ट नाही.एकप्रकारे हत्ती सांभाळणे परवडेल पण शर्यतीच्या बैलांचा सांभाळ करणे,त्यांचे संगोपन करणे,त्यांच्या आरोग्याची सतत काळजी घेणे तसेच सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचा खुराक सांभाळणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडन्याजोगे आहे.शर्यतीच्या एका बैलाचा खुराक म्हणजे सकाळ व संध्याकाळ दोन्ही मिळून ४ लिटर दुध,उंड्याच्या मेळवनामध्ये १०० ग्रॅम काजू व १०० ग्रॅम बदाम,दररोज विशिष्ट तेलाने मालिश, तब्बल सातशे ते आठशे रुपयांचा रतीब एका बैलास लागतो.यातील परवडने किंवा न परवडने हा व्यवसायाचा भाग जरी असला तरी हा खेळ म्हणजे सन्मानाचा असल्याने एक आत्मिक समाधान या छंदाद्वारे मिळते असे वानखेडे यांनी सांगितले.


येथीलच बैलगाडा शर्यतीचे शौकीन असणारे शिवानंद जनार्धन मुंढे यांनी बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने यासंबंधी असणाऱ्या ग्रामीण भागातील व्यवसायास चालना मिळाली असल्याचे सांगितले.यामध्ये बैलगाडा शर्यतीसाठी धावपट्टी तयार करणे,शर्यतीच्या ठिकाणी चहा नाश्त्याचे हॉटेल,बैलांच्या सजावटी साहित्याचे दुकान,चारा व्यावसायिक,शर्यतीच्या गाड्या विक्रीचे व्यवसाय,गाडीवरील चालक ज्याला एका शर्यतीचे जवळपास सहाशे रुपये मिळतात अशा धुरकरीस रोजगार मिळणे तसेच पुणे,मुंबई,सोलापूर,कोल्हापूर हेच नव्हे तर कर्नाटक,तामिळनाडू, केरळ,हरियाणा,गुजरात,पंजाब या ठिकाणच्या बैलगाडा शर्यतीचा छंद असणाऱ्या शौकिनाकडून लाखोंची किंमत देऊन शेतकऱ्यांच्या बैलांची खरेदी अशा व्यवसायास गती मिळाल्याचे सांगितले आहे.

किनगावराजा येथीलच गोपाल सुभाष पाटील यांच्या ‘मल्हार’ नावाच्या शर्यतीच्या बैलाची तब्बल ३ लाख ६५ हजार रुपयात जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील किरण राजपूत यांनी खरेदी केली असल्याची माहिती मिळाली आहे. मल्हारची खरेदी गोपाल पाटील यांनी दीड महिन्यांपूर्वी चाळीसगाव येथून १ लाख ३१ हजार रुपयात खरेदी केली होती.अवघ्या दीड महिन्यातच पाटील यांना २ लाख ३४ हजार रुपयांचा नफा मल्हार ने मिळवून दिला आहे.बैलगाडा शर्यत सुरु झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणास कशा पद्धतीने चालना मिळते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.