किनगाव राजा – किनगाव राजा येथे संत श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळा भाविकांच्या भक्ती च्या नांदीत संपन्न झाला बुलढाणा जिल्ह्यातील पंढरपूर असे मानले जाणारे शेगाव नगरीचे संत श्री गजानन महाराज यांचा आज १४४ प्रगट दिन सोहळा आज किनगाव राजा येथे १७ वर्षांपासून चालू असलेली परंपरा कुठल्याही प्रकारचा खंड न पडता आज सोहळा भाविक भक्तांच्या व जनसमुदायाच्या साक्षीने मोठ्या उत्साहात पार पडला प्रगट दिनाचे नियोजन गावकरी मंडळ यांनी केले होते,
किनगावराजा पंचक्रोशीतील आसपास खेड्यांमधील सर्व भाविक भक्तांनी प्रगट दिनाचा आपली उपस्थिती लावली. सकाळी संत गजानन महाराज यांच्या पालखीने संपूर्ण टाळ आणि मृदुंगाच्या वाद्याने भक्तीच्या जय गजानन, गण गण गणात बोते, अशा गजरात गाव प्रदक्षिणा पूर्ण केली,
त्यानंतर, इच्छुक भाविक भक्तांनी पारायण वाचन केले,पारायण वाचनकरत्या मधून या वर्षीसाठी निशा बाळू झोरे या मुलीच्या आई वडील यांनी संत गजानन महाराजांची आरती घेतली व संत गजानन महाराज यांच्या महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी समस्त गावकरी यांनी आपले योगदान दिले व उपस्थित होते.