शेगांव-महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे तर्फे नोव्हे -२१ मधे झालेल्या टंकलेखन, संगणक टंकलेखन व लघुलेखन यांच्या स्पिड परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेचा परीक्षेचे निकाल अध्यापही लागलेले नाहीया संबधी असे की,मागील २ वर्षा पासुन या परीक्षेवर कोवीडचे प्रभाव पडल्यामुळे काही परीक्षा रद्द झाल्या किंवा अनिश्चित झाल्या. आता TET च्या घोटाळ्यामुळे वरील परिक्षेवर महासंगट आले आहे. राज्यात २५०० ते ४००० खाजगी संस्था अस्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून लाखो विद्यार्थी परीक्षेला बसवितात.
शासनाने शालेय परीक्षा व महाविद्यालयीन परीक्षा विद्यार्थ्यांच्या गुणवते नुसार उत्तीर्ण करून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू दिले नाही. परंतु परिक्षा परीषदे कडून होणान्या अनेक परीक्षा या काळात रद्द केले किंवा अनियमीत झाल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिक्षा परिषद तर्फे वरील परीक्षेत पास झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शासकिय नौकरी प्राप्त होते. परंतु मागील २/२ वर्षांत पासुन वेळेवर निकाल घोषीत होत नसल्यामुळे युवकांना नौकरीपासुन वंचीत राहावे लागत आहे.
प.प.कडून ह्या परीक्षा नोव्हें. २०२१ झाल्या. TET परीक्षेत झालेल्या महाघोटाळ्या मुळे व त्याची चौकशी सुरू असल्यामुळे संगणत टंकलेखन परिक्षेचा निकाल लांबणीवर पडलेला आहे. परंतु TET महाघोटाळ्याची चौकशी सुरू असतांना नुकत्याच परीक्षा परिषद तर्फे ज्या परिक्षा झाल्या म्हणजे टंकलेखन, संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेचा निकाल न रोकता त्वरीत लावावे. त्यामुळे विध्यार्थ्यांना न्याय मिळेल व प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेवर उपासमारीची पाळी येणार नाही. अशी मागणी मा. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री यांना एका निवेदनाव्दारे महा. राज्य टंकलेखन व लघुलेखन संस्था चालकाची संघटना, मुंबईचे सहसचिव अरुण चांडक यानी केली आहे.