Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

किनगावराजा ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकाऱ्याची आवश्यकता ; ग्रामस्थांच्या कामाचा होतोय खोळंबा

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) -सिंदखेडराजा तालुक्यातील मोठ्या ग्रामपंच्यातमध्ये गणल्या जाणाऱ्या किनगावराजा येथील ग्रामपंचायतीचा कारभार सध्या प्रभारी ग्रामसेवकाच्या मार्फत सुरु असून तब्बल ३ ग्रामपंचायतीचा कारभार सदर ग्रामसेवक पाहत असून यामुळे येथील ग्रामस्थांच्या कामाचा मात्र खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.


सण १९६० मध्ये स्थापन झालेल्या येथील ग्रामपंचायतीमध्ये १३ सदस्य असून गावाची लोकसंख्या जवळपास ७ हजार इतकी आहे.किनगावराजा येथे,पोलीस स्टेशन,सरकारी दवाखाना,गुरांचा दवाखाना,खासगी दवाखाने,विद्युत कार्यालय,तलाठी कार्यालय,राष्ट्रीयकृत व सहकारी बँका,सहकारी संस्था, उच्च महाविद्यालय,आदी कार्यालये असल्यामुळे तसेच आठवडी बाजारही भरत असल्याने जवळपासच्या ८ ते १० खेड्यातील ग्रामस्थांची कामाच्या निमित्ताने येथे नेहमीच वर्दळ असते.मोठी ग्रामपंचायत असल्या कारणाने येथील ग्रामपंचायत कार्यालयास दररोज नियमित उपस्थित राहून सेवा देणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याची(व्हिडीओ) नितांत आवश्यकता आहे.

grampanchayat

कारण येथील ग्रामस्थांना अत्यावश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी ग्रामपंचायतीचा आधार घ्यावा लागतो.त्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती राहणे गरजेचे आहे.परंतु येथील ग्रामपंचायतचा कारभार सद्यस्थितीमध्ये प्रभारी ग्रामसेवक म्हणून अमोल पुंजाजी मेहत्रे हाकलत असून या ग्रामपंचायत बरोबरच जांभोरा व सावखेडतेजन या ग्रामपंचायतचा कारभारही त्यांच्याकडे आहे.येथील ग्रामपंचायतकरिता रविंद्र कारभारी काळूसे या ग्रामविकास अधिकाऱ्याची ग्रामसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असूनही त्यांच्याकडे किनगावराजा ग्रामपंचायतच्या तुलनेने लहान असलेल्या व येथून जवळच असलेल्या राहेरी बुद्रुक या गावच्या ग्रामपंचायतचा कारभार सोपविण्यात आला आहे.सदर ग्रामविकास अधिकारी रविंद्र काळूसे यांची किनगावराजा ग्रामपंचायत येथे नियुक्ती असतांना त्यांच्याकडे राहेरी बुद्रुक ग्रामपंचायतीचा कारभार का सोपविण्यात आला ? हे कोडे येथील ग्रामस्थांना उलगडत नसून ग्रामविकास अधिकारी काळूसे हे ग्रामपंचायतमध्ये कुणाचेच ‘जमू’ देत नाही यामुळेच त्यांच्याकडील कारभार काढून घेऊन आपल्या मर्जीतील ‘जमू’ देणाऱ्या ग्रामसेवकाच्या हातात ग्रामपंचायतचा कारभार देण्यात आला असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सध्या सुरू आहे.


दिनांक २८ रोजी शुक्रवारी येथील आठवडी बाजार असतांना तसेच येथील ग्रामस्थ सचिन नंदकिशोर मांटे यांनी घनकचरा व्यवस्थापन संदर्भात होत असलेल्या कामामध्ये अनियमितता होत असल्याची तक्रार दिल्याने त्या कामाच्या चौकशीकारिता विस्तार अधिकारी उपस्थित राहूनही ग्रामसेवकच गैरहजर असल्याने चौकशीची तारीख लांबल्याचा प्रकारही नुकताच घडला असून वरिष्ठांच्या आदेशाबाबत ग्रामसेवक गंभीर नसल्याचे दिसून आले आहे.

नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका ग्रामस्थाने सांगितले की ‘मला कामगार म्हणून रिन्यूल नोंद करण्यासाठी कागदपत्रांवर ग्रामसेवकाचे सही व शिक्क्याची आवश्यकता होती शुक्रवार असल्याने ग्रामसेवक कार्यालयात हजर असेल या आशेने ग्रामपंचायत कार्यालयात गेलो असता ग्रामसेवक गैरहजर होते त्यांना फोन केल्यास मी जांभोरा येथे आहे असे सांगितल्यावर मी जांभोरा येथे मोटर सायकलने गेलो तेथेही ग्रामसेवक गैरहजर होते.त्यांना परत फोन केल्यास मी सिंदखेडराजा येथे आहे असे सांगण्यात आले व आता तुम्ही येऊ नका मी शनिवारी येतो असे सांगितले.हातातील कामे सोडून विनाकारण चकरा माराव्या लागल्याने आर्थिक व मानसिक मनस्ताप झाल्याचे सदर ग्रामस्थाने सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.