राजमाता जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा पर्यटन विकास आराखड्यास व लोणार (सरोवर ) पर्यटन विकास आराखड्यातील विकास कामे प्रशासकीय मान्यता.
सिंदखेडराजा (प्रतिनिधी सचिन मांटे) – बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील राजमाता जिजाऊ जन्मस्थळ यास सिंदखेड राजा चे विद्यमान आमदार व राज्याचे अन्न व औषध डॉक्टर शिंगणे यांच्या अथक प्रयत्नाने सिंदखेड राजा पर्यटन साठी जिल्हा बुलढाणा पर्यटन विकास आराखड्यातील कामे अति प्रशासकीय मान्यता१२९६.४९ लाखाची पूर्वी वितरत निधी १३१.१५ लाख आणि नवीन आदेशानुसार ३३९.६३ लाख रुपये वितरीत करण्याचा आदेश आला.
यामध्ये
१)लखुजीराव जाधव राजवाडा ४१४. ११
२ सावकारवाडा १९८. २३
३ रंगमहाल २१२. ०७
४ निळकंठेश्वर मंदिर १२७. ७९
५ काळाकोट ३४४. १९
तसेच बुलढाणा जिल्यातील लोणार (सरोवर ) पर्यटन विकास आराखड्यातील विकास कामे यासाठी ९१२९. ०० ची प्रशासकीय मान्यता देण्यात आली यातील १७५१. २४ पूर्वी वितरित केलेला निधी व आजच्या आदेशाद्वारे १५४०. ११ हा निधी वितरित करण्याची मान्यता देण्यात आली .
असा एकूण प्रकारे निधी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झाला आहे.