ग्रामपंचायत विझोरा अंतर्गत गोठा व शेळी पालन शेड बांधकाम मध्ये झालेल्या भ्रष्टाचार विषयी चौकशी करण्यात यावी- युवकाचे गटविकास अधिकारी यांना निवेदन
(प्रतिनिधी सचिन मांटे)
सिंदखेडराजा तालुक्यातील गट ग्रामपंचायत विझोरा राहेरीखुर्द सन २०१७ ते २०२१ पर्यंत रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांसाठी गोठा व शेळी पालन शेड याची बोगस कामे झाली आहे,ग्रामपंचायत ने पात्र लाभार्थी वगळून अपात्र लाभार्थ्यांच्या खिशात ही योजना घातली आहे. ग्रामपंचायत कार्यालय यांनी प्रत्येक लाभार्थ्यांकडून १५००० घेऊन त्यांचे बोगस गोठे बनवून दिले आहे,
याची आज रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास कडे एकही गोठा बांधलेला नाही परंतु सचिव व सरपंच यांच्या संगनमताने व व गावातील पुढारी यांच्या संगनमताने परस्पर ठराव घेऊन ते लाभार्थी निवडलेले आहे. परंतु योजनेपासून ज्यांना योजनेचा खरोखर लाभ मिळालेला पाहिजे होता.
ते मात्र वंचित राहिलेले तरी आज पर्यंत जेवढ्या लाभार्थ्यांना हा भेटलेला आहे अशा लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कठोर कारवाई करावी असे निवेदन राहेरीखुर्द येथील उद्धव घुगे, नारायण घुगे यांच्याकडून गटविकास अधिकारी यांना देण्यात आले