सचिन मांटे(प्रतिनिधी) – किनगावराजा पासून जवळ असलेल्या चांगेफळ येथील रेती घाटातून लिलाव झालेला नसतांनाही अवैधरित्या रेती उपसा होतअसून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा त्वरित स्थळ पंचनामा करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते अशोक बालासाहेब मोगल यांनी तहसीलदार यांना अर्जाद्वारे तक्रार केली आहे.
तक्रार केलेल्या अर्जात अशोक बालासाहेब मोगल यांनी सावरगाव तेली,भूमराळा येथील रेतीघाटाचा लिलाव झाला असून ठेकेदारांनी मात्र चांगेफळ हद्दीतील लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन केले आहे.त्यामुळे ज्या गटातून अवैधरित्या उत्खनन झाले त्या गटातून एकूण किती उत्खनन झाले त्याचा लेखी अहवाल मिळावा तसेच स्थळ निरीक्षण,पंचनामा करून त्याची प्रत साक्षांकित करून मिळावी अशी मागणी अर्जाद्वारे तलाठी,मंडळ अधिकारी तसेच तहसीलदारांना केली आहे.