अमोल भट ९९७०७४४५५४
2019 ला महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल असं चित्र निर्माण झालं होत व झालेल्या लोकसभा निवडणूक वरून तस दिसत होते. शरद पवारांच्या पक्षातील खंदे समर्थक त्यांचे जुने सहकारी एक एक करत पक्ष सोडून जात होते शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक असलेले राणाजगजितसिंह पाटील , जुने सहकारी मोहिते ,भोसले असे मातब्बर पक्ष सोडून गेले पण या परिस्थितीतही शरद पवार हे विचलित न होता वयाच्या उतारात असताना महाराष्ट्रातील राजकारणात एक नवा अध्याय लिहिण्यास सज्ज झाले होते . " मी अजून म्हातारा झालो नाही , मी तरुण आहे " असं म्हणत वयाच्या ७८ व्या वर्षी शरद पवारांनी महाराष्ट्रातील युवकांसमोर लढण्याचा नवा आरंभ केला होता .
2019 विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विरोधक सुद्धा समजण्यास तयार नव्हते देवेंद्र फडणीस पासून अमित शहा पर्यंत सर्वांच्या भाषणात शरद पवार यांच्या विषयीच्या टीका-टिप्पणी पाहिली तर वरवर ते शरद पवार व त्यांच्या पक्षाच्या वादात यावर बोलत त्यावर शरद पवार आत्मविश्वासाने म्हणून *"अजून बऱ्याच जणांना घराकडे पाठवायचा आहे "* 2014 नंतर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था सगळीकडेच प्रभाव वाढत होता. निवडणुकीत भाजपला मिळणारे यश हे राष्ट्रीय पातळीवरील होतं त्यांच्या प्रत्येक निवडणुकीचा चेहरा नरेंद्र मोदी हेच आहे त्या तुलनेत शरद पवारांचे राजकारण हे स्थानिक जिल्हा , तेथील भौतिक परिस्थिती, तेथील सहकार यावर विणलेले होत भाजप प्रखर राष्ट्रवाद हिंदुत्व व आयात केलेल्या नेत्यांच्या जोरावर निवडणूक रणसंग्रामात उतरते भाजपने निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच शरद पवारांच्या विरोधात शरद पवार विरुद्ध भाजप असा आखाडा उभा केला होता .
सोलापूरच्या सभेत अमित शहा म्हणाले पवार यांनी महाराष्ट्र साठी काय केले याचे उत्तर टाळेबंदी झाल्यावर परिस्थितीनेच दिले मुंबई आणि महाराष्ट्रातून परप्रांतीय मजुरांचे लोंढे घराकडे निघाले परंतु इतर राज्यातून अशा प्रकारे येतांना महाराष्ट्रीयन मजूर दिसला नाही म्हणजेच महाराष्ट्रात रोजगार निर्मिती झाल्यामुळे मराठी माणूस क्वचितच रोजगारासाठी इतर राज्यात जातो आणि हेच रोजगार उद्योग धोरण शरद पवार यांच्या काळापासून सुरू आहे अमित शहा मोदी हे पवारांवर टीका करू लागले त्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस मधून प्रत्युत्तर देण्यासाठी सुद्धा काही अपवाद वगळता नेते पुढे येत नव्हते व येतही नाही आर आर पाटील जिवंत असेपर्यंत आरोप करणाऱ्यांना ते सरळ सरळ अंगावर घ्यायचे. आता ही शरद पवारांना होणाऱ्या टीकेस जितेंद्र आव्हाड आक्रमकतेने उत्तर देण्यासाठी पुढे येतात तसेच इतर नेते येत नाही . निवडणुकीच्या पूर्वी सुप्रिया सुळे यांची एक पोस्ट प्रचंड लोकप्रिय झाली होती
“थकलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी,*लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी “
शरद पवार हे व्यक्तिमत्त्व कधीच आत्मकेंद्री राजकारण करत नाही त्यांच्या कार्याचा त्यांना मी पणा नसतो व ते प्रसिद्धीपिपासूं नेतृत्व नाही हे वेळोवेळी त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास लक्षात येते . पत्रकारांना सहज सामोरे जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे ते आपल्या निर्णयावर ठाम असतात त्यांच्या निर्णयाचे परिणामाची चिंता करत नाही परिणामांना घाबरून न राहता त्याला सामोरे जाणे व प्रत्येक संकटानंतर नव्या ताकतीने उभे राहणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार .
शरद पवारांच्या राजकीय प्रवासातील 2019 ची निवडणूक ही शरद पवारांसाठी खूप अवघड अशी निवडणूक होती संसदीय कारकीर्दीत वयाची 50 वर्षे देणारा व जास्त काळ सत्तेत असणारा नेता यांना वयाच्या 78 व्या वर्षी निवडणुका हरल्याने काय नुकसान होणार होते व जिंकूनही व्यक्तिगत काही व्हायचे नव्हते . सुरुवातीला पक्षबदलून जाणाऱ्या घराणेशाहीतील मातब्बरांची निवडणूक नंतर मध्यम वर्गाकडे वळविण्यात शरद पवार यशस्वी झाले.
आपले अनेक साथीदार साथ सोडून गेल्याने दुःख करत न बसता शरद पवार नव्याने कामाला लागले त्यात स्वपक्षांची साथ किती मिळाली यावर स्वतंत्र चर्चा करता येईल . महाराष्ट्रातील काँग्रेस तर निवडणुकीपूर्वीच कोमामध्ये गेली होती किंवा त्यांनी आधीच ठरवलं होतं की आपण सत्तेत येऊ शकत नाही आणि तशाच आविर्भावात त्यांचे महाराष्ट्रातील नेतृत्व होते काँग्रेस चे जे आमदार निवडणूक जिंकले त्यातील बरेच व्यक्तिगत उमेदवारांमुळे व काही राष्ट्रवादी सोबतच्या असलेल्या आघाडीमुळे जिंकले असे असूनही व महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळे काँग्रेस सत्तेच्या खुर्चीत आहे त्याच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादीच्या दुकानदारी बंद करण्याची भाषा बोलतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो. सातारा मधील सभेत शरद पवार डायसवर आले तेव्हा पाऊस कोसळतच होता परंतु त्या पावसात उपस्थित अनेकांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली हे चित्र महाराष्ट्राने पाहिले.
“78 वर्षांचा तरुण म्हातारा पावसाला अडवू शकत नव्हता,
पण पाऊस हि म्हातार्याला रोखू शकला नाही “
शरद पवारांच्या साताऱ्याच्या सभेत तरूण एक घोषणा करत होते
“कोण आला रे कोण आला , मोदी शाहा चा बाप आला “
या घोषणेची प्रचिती निवडणुकीनंतर शरद पवारांनी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केल्यावर आली . मणिपूर ,गोवा ,मध्य प्रदेश ,कर्नाटक येथे संख्याबळ कमी असूनही सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपास महाराष्ट्रात 105 इतके संख्याबळ असूनही विरोधी बाकावर बसणारे शरद पवार काय करू शकतात हे समजले असणार आणि मोदी शहाला शह देता येऊ शकतो हा संदेश भाजपासह भाजपाईतर पक्षात गेला . इंदिरा गांधी यांना आव्हान देणारा मराठी नेता ते मोदींना शह देणारा नेता अशी त्यांची ओळख निर्माण झाली . संकटांशी लढण्याचं वरदान लाभलेला , प्रतिकूल परिस्थितीत लढायचं कसं , आयुष्यभर महाराष्ट्रासाठी भरभरून दिलेलं आयुष्याच्या सांजवेळी ही आपल्या 2019 च्या लढाईतून खूप काही शिकवणाराव्यक्तिमत्व.
” जेव्हा सगळं संपलं असं वाटायला लागतं तेव्हा शरद पवार समजून मैदानात उतरा ” आयुष्याची 82 वर्ष पूर्ण करणाऱ्या या अद्भुत व अद्वितीय ऊर्जास्त्रोत्रास दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा .
you can love sharad pawar
or
hate sharad pawar but….
you can ‘t ignore sharad pawar