प्रतिनिधी-सचिन मांटे
सिंदखेडराजा तालुक्यात एकूण ८० ग्रामपंचायती असुन प्रतेक ग्रामपंचायतीला महाराष्ट्र राज्य ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत गावाला मिळणाऱ्या नवीन विहीरी व डाँ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत असलेल्या नविन विहीरी अशा ८० ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या ५३ गावात भुजल सर्वेक्षण विभागाने सेमी क्रीटीकल ची अट टाकुन विहिर खोदण्यास परवानगी नाकारल्याने या 53 गावातील ईतर अल्पभुधारक व अनुसुचित जाती चे शेतकरी यांना विहीर मंजूर होऊन सुद्धा लाभार्थी वंचित राहिलेअसुन माञ या अल्पभुधारक शेतकऱ्यांची व्यथा लोकप्रतिनीधी समजुन घेऊन भुजल सर्वेक्षण विभागाला पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन लाभार्थ्याला नविन विहिरीचा लाभमिळावा अशी मागणी या लाभार्थ्याकडुन होत आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात ५३ गावे म्हणजे च ५३ शिवारामधे भुजल सर्वेक्षण विभागाने सेमी क्रीटीकल एरीया म्हणून विहिर खोदता येणार नाही असा आदेश पारीत केला. वास्तविक पाहता सिंदखेडराजा तालुक्यात पडलेल्या पावसाने ऊच्चांक गाठुन आजही नदी नाले तुडुंब भरुन वाहत आहे पावसाची शासन दरबारी याची नोंद सुद्धा झाली आहे त्या मुळे जमिनीत भरपुर पाणी आहे .एकंदरीत पाण्याची पातळी वाढल्यामुळे भुजल सर्वेक्षण विभागाने पुन्हा सर्वेक्षण करुण अनुसुचित जाति च्या लाभार्थ्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालंबन योजने अंतर्गत मिळणारा सिंचण विहीराचा लाभ तर ईतर लाभार्थ्याना ग्रामपंचातिनी पंचायत समिती ला सादर केलेल्या आराखड्यानुसार यादीतील ईतर शेतकऱ्यांना एमआरईजीस मधुन लाभ मिळावा अशी मागणी या निमित्तानं शेतकरी करत आहेत.भुजल सर्वेक्षण विभागाच्या याअटीमुळे शेतकऱ्यांमधे प्रचंड संताप व्यक्त होताना दिसुन येत आहे. निवडणूकीत मागासवर्गीयांना आश्वासन दिल्या जाते माञ निवडणूकी अगोदरच सर्व च पक्षानी भुजल सर्वेक्षण विभागाकडे मागणी करुन या विभागाने टाकलेली जाचक अट रद्द करुन लाभार्थ्यांना विहिरीचा लाभ मिळवुन द्यावा अशी मागणी तर होत आहेच यामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना नविन विहिरि चा लाभ मिळेल एकंदरीत भुजल सर्वेक्षण विभिगाची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी या लाभार्थ्यांकडून होत आहे