सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या विविध प्रश्नांसंबधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी सकारात्मक मार्ग काढण्यात आला. तसंच सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं आहे, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांनी दिला. यावेळी ना.छगन भुजबळ, ना.डॉ.राजेंद्रजी शिंगणे, ना.दादाजी भुसे,ना.नितीनजी राऊत, शेतकरी नेते श्री. रविकांत तुपकर उपस्थित होते.