मोसंबी, केळी व आंबा फळपिकाकरिता 31 ऑक्टोंबर, तर संत्रा फळासाठी 30 नोव्हेंबर अंतिम मुदत
डाळींब फळपिकासाठी 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत
गारपीट नुकसानीला मिळणार अतिरिक्त संरक्षित विमा रक्कम
प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सन 2021-22, 2022-23 व 2023-24 या तीन वर्षांसाठी आंबिया बहारासाठी 18 जुन 2021 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, आंबा व डाळींब या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. त्यामुळे निश्चितच फळपिकांना विम्याचे कवच प्रदान होणार आहे.
अवेळी पाऊस, कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त तापमान, जादा आर्द्रता, जास्त पाऊस, कमी पाऊस, पावसाचा खंड व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच आर्थिक सहाय्य देणे व फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे.
शेतकऱ्यांनी कर्जदार व बिगर कर्जदार योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून प्राथमिक सहकारी संसथा /बँक/ आपले सरकार केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे तसेच शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम फळपिकनिहाय वेगवेगळी आहे. मोसंबी, आंबा व केळी फळपिकाकरीता 31 ऑक्टोंबर, संत्रा फळपिकासाठी 30 नोव्हेंबर, डाळींबकरीता 14 जानेवारी 2022 अंतिम मुदत आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता लागू आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याचा अतिरिक्त विमा संरक्षण घ्यायचे असलयास मुळ हवामान धोक्यासहीत केवळ बँकेमार्फत विमा प्रस्ताव सादर करणे अनिवार्य आहे. सर्व शेतकऱ्यांनी अधिसूचीत हवामान धोके विचारात घेवून विमा करावा. प्रती शेतकरी सर्व पिके मिळून जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्राचा विमा करता येणार आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेशी किंवा तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक यांचेशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले आहे.