सिंदखेडराजा/ प्रतिनिधी
तालुक्यातील आडगावराजा ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच पदी सौ.सरीता प्रकाश सोनुने यांची आज ग्रामपंचायतच्या सभागृहात एकमताने एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अविरोध निवड करण्यात आली.
आडगावराजा ग्रामपंचायतीच्या ऊपसरपंच श्रीमती सरस्वती भगवान चव्हाण यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिला होता .त्या अनुषंगाने रिक्त पदासाठी आज दिनांक ११/१०/२०२१ रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच सौ.कासाबाई मानसिंग कहाळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ऊपसरपंच पदासाठी सौ.सरीता प्रकास सोनुने यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने एकमताने अविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष राजे जाधव, गजानन राजे जाधव, श्रीमती सरस्वती भगवान चव्हाण , प्रकास सोनुने, सौ.संगिता सुखदेव काळे, सौ.अलका मिलींद कहाळे, सौ.लक्ष्मीबाई भागाजी डोंगरे,सौ. सुमन मधुकर चव्हाण आदी सदस्य हजर होते .यावेळी निवडणुका निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतचे सचिव अशोक ठाकरे यांनी कामकाज पार पाडले .यावेळी गावातील सर्व क्षेत्रातील जेष्ठ गावकरी तथा तरुण युवक हजर होते
Related Posts