चिखली – सप्टेंबर महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात 5-7 दिवस झालेल्या सततच्या पावसाने झालेल्या अतिव्रृष्टी मुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सदरच्या अतिवृष्टीमुळे चिखली तालुका तसेच बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी वर्गाची हातातोंडाशी आलेले सोयाबिन पिक पाणी साचल्याने दोळ्यादेखत कामातून गेले. काही ठिकाणी उभ्या झाडांना असलेल्या शेंगांना कोंब फ़ुटले तर काही ठिकाणी सोयाबिन च्या दाना सडण्यास सुरुवात झाली आहे.
या संकटातून सावरण्यासाठी नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना सरसकट रुपये 50 हजार प्रति हेक्टर मदत मिळावी असे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेच्या वतीने आज चिखली तहसिलदाराच्या मार्फ़त मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनाची प्रतिलिपी बुलडाणा जिल्ह्याचे नेते तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांना ही तहसिलदारांच्या मार्फ़त देण्यात आली.
याप्रसंगी बोलतांना राष्ट्रवादी किसान सभा जिल्हा अध्यक्ष राजीव जावळे यांनी सांगितले की ही वेळ राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांच्या पाठिमागे खंबिर पणे उभे राहण्याची आहे. शेतकरी ख-या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा ओढत असतो. परंतु दिल्लीश्वरांनी सुविधांच्या बाबतीत आज पर्यंत शेतक-याला गृहीत धरले आहे. आजच्या या कठीण काळात दोन्ही सरकारांनी शेतक-यांच्या पाठीमागे उभे राहून बांधिलकी जोपासून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी.
याप्रसंगी बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी किसानसभा जिल्हा उपाध्यक्ष नरसिंग पाटील गाडेकर, चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ, विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुका उपाध्यक्ष डॉ विकास मिसाळ, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते डॉ प्रकाश शिंगणे, मनोज पाटील खेडेकर, किसानसभेचे नवनियुक्त अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील हाडे, सतिष पाटील भुतेकर, दादाराव सुरडकर, शिवदास भांदर्गे सुरेश राजे, गुलाबरा मिसाळ, भगवानराव पवार. विष्णु महाराज गाडेकर, अनंथा गाडेकर, जगन्नाथ गाडेकर, संतोष्रव बोर्डे ज्ञानेश्वर गावडे, ज्ञानेश्वर वरपे, शरद गावडे, सतिष पाटील आंभोरे, रिक्कि काकडे, अनिकेत पाटील एत्यादी शेतकरी पदाधिकारी उपस्थीत होते.