किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) – गोपनीय स्रोताकरवी मिळालेल्या माहितीच्या आधारे किनगावराजा पोलिसांनी अवघ्या ४८ तासाच्या आत विहिरीतील पाण्यामधील मोटरपंप चोरून नेणाऱ्या चोरट्यास पकडले असून चोरट्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.
सदर घटना येथून जवळच असलेल्या ग्राम सोयंदेव येथे घडली असून किनगावराजा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १५ सप्टेंबर रोजी शिवनारायण दत्तात्रय नागरे यांनी स्वतःच्या विहिरीतील पाण्यामधील मोटर चोरीला गेल्याची तक्रार दिली होती.यावर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करून ठाणेदार युवराज रबडे यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत सोयंदेव,रुम्हणा,जंभोरा,सोनोशी,चांगेफळ परिसरातील गोपनीय माहिती स्रोतांच्या आधारे अवघ्या ४८ तासाच्या आत दिनांक १६ सप्टेंबर रोजी जांभोरा येथील आरोपी राजीव दत्तात्रय खरात यांस ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली.
केलेल्या चौकशीत राजीव दत्तात्रय खरात यानेच चोरी केल्याची खात्री पटल्यावर आरोपीस अटक केली.दिनांक १८ सप्टेंबर रोजी पोलीस कोठडी रिमांड घेतल्यावर नमूद आरोपीने सदर गुन्हा कबूल करून फिर्यादी शिवणारायन दत्तात्रय नागरे यांच्या विहिरीतून चोरलेली ११५०० इलेक्ट्रिक एक्वॉटेक्स कंपनीच्या २ मोटर पंप संच पंचासमक्ष काढून दिल्या.आरोपीस ताब्यात घेतले असून आरोपीवर अ. प.२४८ भा.दं. वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल अशोक चाटे,गजानन सानप,श्रावण डोंगरे,शिवाजी बारगजे,करीत आहे.