Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना अलर्ट : प्राप्त 959 कोरोना अहवाल निगेटिव्ह तर 12 पॉझिटिव्ह

  • 22 रुग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा, दि. 8 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 971 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 959 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 155 तर रॅपिड टेस्टमधील 804 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 959 अहवाल निगेटीव्ह आहेत.                                                                                      

corona

    पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  चिखली तालुका : तेल्हारा 1, बुलडाणा शहर : 1, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : सिनगांव जहागीर 5, नांदुरा तालुका : वडोदा 3  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 12 रूग्ण आढळले आहे.  तसेच वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारांती 22 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.                                                                             

     त्याचप्रमाणे आजपर्यंत 700013 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86764 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  86764 आहे.  आज रोजी 1159 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 700013 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87499 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86764 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 62 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.