आगामी येणारे सण-उत्सव नियमाचे पालन करून साजरे करा-ठाणेदार निर्मला परदेशी.
मेहकर : मेहकर पोलिस स्टेशनला नुकत्याच नियुक्त झालेल्या लेडी सिंघम ठाणेदार निर्मला परदेशी यांची देऊळगाव माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला. तसेच आगामी येणाऱ्या सण-उत्सव यासंबंधी चर्चा करण्यात आली. यावेळी ठाणेदार निर्मला परदेशी यांचा सरपंच किशोर गाभणे, उपसरपंच रंगनाथ चाळगे, पंचायत समिती सदस्य शिवप्रसाद मगर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर, पोलीस पाटील गजानन चाळगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवी मगर व आदी मान्यवरांनी मेहकर पोलिस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाप्रसंगी ठाणेदार निर्मला परदेशी यांनी येत्या काही दिवसांवर पोळा,गणेशोत्सव,नवरात्री, हे सण आले
आहेत गेल्या दोन वर्षापासून सर्वच सण उत्सवावर या कोरोना महामारी मुळे संकट ओढवले असून यंदाही प्रशासनाकडून कोरोना च्या तिसऱ्या
लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आगामी सण-उत्सव यामध्ये पोळा,गणेशोत्सव,नवरात्री हे सर्व सण कोरोना विषयक सर्व
निर्बंधाचे पालन करून अगदी शांततेत साधेपणाने साजरे करावे
तसेच या कालावधीमध्ये आरोग्य विषयकउपक्रम,रक्तदानशिबिरे, आयोजित करून आरोग्यविषयक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात यावे तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व या सण उत्सवादरम्यान कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आपण स्वतः खबरदारी घ्यावी. तसेच गणेश उत्सवा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी गावातील सर्व गणेशमूर्तीचे एकत्रित संकलन करून विसर्जन करावे असे आवाहन यावेळी ठाणेदार यांनी केले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.सुरूशे, शेषरावबापू सुरूशे राजेश मगर, सौ.किरण गाभणे, ज्ञानदेव बळी,कैलास राऊत, मेहकर पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजगुरू यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.