Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

बालगृहातील बालकांसाठी रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबीर उत्साहात

बुलडाणा, दि. 2 : जिल्हा महिला व बालविकास विभागा अंतर्गत काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल झालेल्या बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येते. या आरोग्य विषयक उपक्रमाचा भाग म्हणून शासकीय मुलांचे निरीक्षण गृह / बाल गृह बुलडाणा येथे 1 सप्टेंबर रोजी रक्त गट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर उत्साहात

Inspection camp

   सदर तपासणी शिबिराला प्रमुख उपस्थितीमध्ये बाल न्याय येथील प्रमुख दंडाधिकारी अमोल देशपांडे होते. तर अधिक्षक तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक मारवाडी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती किरण राठोड, बाल न्याय मंडळ सदस्य वर्षा पालकर, नंदा लोडोकार व संस्था कर्मचारी उपस्थित होते. तपासणी शिबिरासाठी चव्हाण पॅरामेडीकल कॉलेज, बुलडाणा चे प्राचार्य अमोल चव्हाण व विद्यार्थ्यांमार्फत बालगृहातील बालकांची तपासणी करण्यात आली. बालकांचे रक्त गट व हिमोग्लोबीन तपासणीचा वापर संस्थेतील बालकांचे सुदृढ आरोग्य आणि आहार नियोजन यासंदर्भात बालगृहामार्फत करण्यात येणाऱ्या आरोग्य विषय सेवा उपाययोजना याबाबत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतीपादन न्यायाधीश श्री. देशपांडे यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.