रवींद्र सुरुशे – सहकार क्षेत्रात श्री.मुंगसाजी महाराज पतसंस्थेने अतिशय कमी कालावधीत उंच भरारी घेऊन अमरावती विभागातून अतिशय मानाचा असलेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी देऊळगाव माळी गावकऱ्यांच्या वतीने श्री.मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक भाऊ देशमाने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत सावतामाळी मित्र मंडळ,यांच्या वतीने मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.विठूमाऊली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, यांच्या वतीने कंपनीचे अध्यक्ष बाबुराव मगर, सुभाष मगर, व सर्व संचालक मंडळ यांनी सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
संत तेजस्वी शेतकरी उत्पादक कंपनी, यांच्या वतीने पुरुषोत्तम भराड संचालक मंडळी, तसेच विठू माऊली कृषी सेवा केंद्र, यांच्यावतीने बी.के.सुरुशे. मच्छी बिज केंद्र, यांच्यावतीने शिवाजी लोणकर, श्री.मारुती गणेश मित्र मंडळ, यांच्यावतीने राहुल सुरुशे व मंडळातील सर्व कार्यकर्ते तसेच क्रांतीसुर्य तालीम संघ व योग प्राणायाम समिती यांच्या वतीने गणेश लोणकर, गावातील विविध बचत गट, तसेच एन.ए.बळी यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती दीपक देशमाने यांनी सांगितले की, ही जी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य होत असलेली श्री मुंगसाजी महाराज पतसंस्था की आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर येत आहे.
यामध्ये आमच्या संचालक मंडळात पेक्षाही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उंच भरारी घेत आहे. कोणत्याही बचत गटाला, युवावर्गाला उद्योग जगतामध्ये उतरावे व यासाठी कोणतीही मदत लागल्यास अध्यक्ष या नात्याने मी आपणास सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी दिल. याप्रसंगी या कार्यक्रमास माजी सरपंच अशोक गाभणे, माजी सरपंच सुभाष राव मगर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर, पोलीस पाटील गजानन चाळगे तसेचश्री मुंगसाजी महाराज पतसंस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, गावातील विविध बचत गटातील संचालक मंडळ, तरुण मंडळी व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजगुरू, व कैलास राऊत यांनी केले.