सिंदखेड राजा सचिन मांटे – तडेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परचा अपघात होऊन त्यात बसलले १६ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. यातील जवळपास 13 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गंभीर जखमींना जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात २०ऑगस्ट रोजी दुपारी १२च्या सुमारास घडला.
प्राथमिक माहितीनुसार अज्ञात वाहनाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असावा वाहन सरळदिशेने चालून येऊन टिप्पर च्या अंगावर आल्यामुळे नाईलाजाने टिप्पर ड्रायव्हरला आपले वाहन थोडे रोडच्या खाली द्यावे लागले.सततच्या पावसामुळे रोडच्या कडेला जमीन नरम झाल्यामुळे टिप्पर चे टायर त्याठिकाणी दबले आणि टिप्पर पलटी झाले.यात असलेले मजूर गंभीर जखमी झाले असून यात जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गंभीर जखमींना त्वरित जालना येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यातील तीन जखमींना सिंदखेड राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातातील मृतांचा नेमका आकडा किती ही बाब अद्याप स्पष्टपणे सांगता येणार नाही.अपघातामधील गंभीर जखमी मजूर व मृतक हे मध्यप्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळातच किनगाव राजा पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना त्वरित जालना येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातानंतर तडेगाव नजीक बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. सोबतच या मार्गावरील वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.