सिंदखेड राजा :
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापिठ अकोला अतंर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगावराजा तालुका देऊळगावराजा जिल्हा बुलडाणा येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थि सचिन केळकर,आशिष तायडे,पवन जाधव,स्वप्नील मुंढे,व तुळशीराम चौधरी यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभाव या कार्यक्रमा अंतर्गत सिंदखेड राजा येथे शेतकऱ्यांना फवारणी करतांना घ्यावयाच्या काळजीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.फवारणी करतांना गळके फवारणी यंत्र वापरु नये.
फावारणीच्या वेळी संरक्षक कपडे,हातमौजे,मास्क यांचा वापर करावा.तणनाशक व किटकनाशाक फवारणीसाठी वेगवेगळ्या पंपाचा वापर करावा.किटकनाशके ही लहान मुले, खाद्यपदार्थ तसेच गुरांपासून दूर ठेवावे.हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये तसेच फवारणी करतांना धुम्रपान वगैरे करु नये.फवारणीचे मिश्रण काठीच्या सहाय्याने ढवळावे.कीटकनाशकांच्या बाटल्या वापरानंतर जमीनीत गाडून नष्ट करावव्यात.फवारणी झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करुन कपडे स्वच्छ धुवावेत ईत्यादी गोष्टींचे महत्त्व पटवून दिले.त्याचबरोबर विषबाधेची लक्षणे जसे की,चक्कर येणे, घाम येणे, उलटी,मळमळ,डोके दुखणे ,पोट दुखणे ,बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवल्यानंतर करावयाच्या उपाययोजना वा प्रथमोपचारही सांगितले . यावेळी अंकुश मेहेत्रे व इतरशेतकरी उपस्थित होते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे ,रावे समन्वयक मोहजीतसिंग राजपूत आणि कीटकशास्र विभागाचे प्रमुख प्रा.विलास चव्हाण व प्रा. मंगेश धांडे यांचे मार्गदर्शन लाभले