रवींद्र सुरुशे
शेलगाव देशमुख व लोणी शिवारामध्ये १८ ऑगस्ट रोजी दुपारी अति मुसळधार ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडल्याने शेलगाव देशमुख येथून वाहणाऱ्या नदीला मोठा पूर आला आहे
या पुरामुळे शेलगाव देशमुख परिसरातील लाखो शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील पिकाची नुकसान होण्याची शक्यता आहे त्यासोबतच शेलगाव देशमुख येथील 25 ते 30 घरी पाण्याने वेढली गेली आहेत यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे शेलगाव देशमुख जवळच्या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे शेलगाव देशमुख चा संपर्क तुटला आहे. सदर नदीच्या पुरामुळे शेलगाव देशमुख बसस्थानकावरील वार्ड नंबर 5 मधील 25 ते 30 घरे हे पाण्याने वेढली गेली असून या पाण्यामुळे या घराची व तसेच बस स्थानकावरील व्यावसायिकांचे त्यासोबतच या परिसरात असलेल्या विद्युत पोलचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे सदर पावसाचे पाणी अद्यापर्यंत वाढतच असून नदीचा पूर कमी होत नसून सदर पाण्यामुळे गावात पाणी घुसले असून खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे नदीच्या पुरामुळे यामुळे गावातील वार्ड नंबर 1 व 5 पाणी शिरले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे