बुलढाणा-कोनड येथील स्व. भगवानराव जावळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजीव भगवानराव जावळे हे कृषीमध्ये पदवीधारक असून एमबीए सुद्धा केलेले आहे अशा या उच्चशिक्षित युवकाची राष्ट्रवादी किसान सभेचे बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी ही निवड केली आहे
.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजीव जावळे हे कृषी मधीलच पदवीधारक असून त्यांनी यापूर्वी कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या बहुराष्ट्रीय बियाणे कंपनीत उच्चपदस्थ जबाबदारी सांभाळलेली आहे आणि राजीव जावळे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने डॉ राजेंद्र शिंगणे यांनी त्यांच्या वर ही जबाबदारी टाकली आहे. शिवाय जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी यांनी सुद्धा राजीव जावळे हे संघटनात्मक बांधणी साठी अतिशय योग्य नाव असल्याची शिफारस प्रदेशाध्यक्ष मा. आ. शंकर आण्णा धोंडगे यांच्या कडे केली असल्याने सदर निवड सोयीची झाली.