सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 4 – सिंदखेड राजा येथील भारतीय स्टेट बँकेतील मॅनेजर एक महिन्यापासून नाही मॅनेजर नसल्याकारणाने शेतकऱ्यांना पीक कर्ज व सर्व सामान्यांची कामे होण्यास अडचणी येत आहे सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 3 ऑगस्ट रोजी बँक मॅनेजर च्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले
सिंदखेड राजा तालुक्यात106 गावी आहेत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी चार चार वेळा चकरा माराव्या लागतात प्रचंड त्रास सहन करावा लागतो बँकेत मॅनेजर नसल्याकारणाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे होत नाही बँकेत गेले अनेक दिवसापासून शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील फाईल तशाच पडून आहेत येत्या आठ दिवसात बँक मॅनेजर ची व्यवस्था करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश देवरे मनसे तालुकाध्यक्ष घनश्याम केळकर मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे महेंद्र पवार आकाश दिघोळे अंकुश चव्हाण यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते