गजानन सोनटक्के जळगाव जा – संकल्पतरू फौंडेशन संस्था पुणे ही संस्था नॉन गवरमेंट ऑर्गानिझेशन गोग्रीन या संकल्पनेतून वृक्षारोपणाचे कार्य सहा ते सात वर्षांपासून करीत आहे व शेतकऱ्यांना फळझाडे लागवडीसाठी रोपे वितरित करीत आहे ग्रामीण उपजीविका वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यामध्ये 10000 सिताफळ व पेरू रोपांचे मोफत वितरण शेतकरी वर्गास करण्यात येत आहे .
यामध्ये खामगाव संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यांचा समावेश आहे या योजनेचा हा उपक्रम सुनगाव येथे खेचून आणण्यात पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे व शेतकरी मंगेश धुर्डे यांचा मोलाचा वाटा आहे या योजनेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना सीताफळ व पेरूच्या रोपांचे वाटप करण्यात आले ही संस्था बाजारात दीडशे ते 200 रुपये किमतीची फळझाडाची रोपे शेतकऱ्यास विनामूल्य देत आहे व रोपाचा प्रत्येकी वीस रुपये संगोपन खर्च देत आहे त्यानुसार सुनगाव येथे शेतकऱ्यांना पेरू व सिताफळ रोपांचे वाटप करण्यात आले तसेच संस्थेचे राज्य समन्वयक सारभुकर यांनी शेतकऱ्यांना मार्गरदर्शन केले यावेळी शेतकरी पांडुरंग नानगदे श्रीकृष्ण ढगे सोनाजी ढगे अंबडकार पंकज धुर्डेआधी शेतकरी उपस्थित होते हा उपक्रम फळझाड लागवडी साठी उपयुक्त ठरत आहे