बुलडाणा, दि. 2 : मातंग समाजातील इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी, पदवी व पदविका, अभियांत्रिक व वैद्यकीय कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची जिल्हा निहाय निवड केली जाते. या लाभासाठी मातंग समाजातंर्गत असणाऱ्या 12 पोट जातीमधील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. यामध्ये मांग, मातंग, मिनी मादीग, मादिगं, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा आदी पोटजातींचा समावेश आहे.
लोकशाहीर साठे शिष्यवृत्ती योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 12 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज सादर करतेवेळी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड प्रत, गुणपित्रका प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आदी दाखल्यांसह सादर करावे. सदर अर्ज दोन प्रतीमध्ये जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा येथे सादर करावा. अधिक माहितीसाठी सदर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.