सिंदखेड राजा :- साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयातील नाईक यांचा सपत्नीक सत्कार करीत सेवानिवृत्त झाल्यामुळे भावपूर्ण निरोप देण्यात आला.आज दि. ३१ जुलै, शनिवारी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रमेश ठोसरे तर सत्कारमूर्ती नाईक बबनराव सखाराम खिल्लारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता खिल्लारे यांच्यासह वसंत पाटील, बाबुराव साबळे प्रमुख उपस्थितीत होते.
निरोप समारंभात प्रारंभी शाल, श्रीफळ, कपडे, साडीचोळी, चांदीची मूर्ती व भेटवस्तू देऊन बबनराव खिल्लारे व सुनीता खिल्लारे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना बबन खिल्लारे यांनी शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, सहकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्याचीच भूमिका ठेवली. त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने केलेल्या कार्यात खारीचा वाटा उचलता आला याबाबत समाधान व्यक्त केले.याप्रसंगी रमेश ठोसरे, वसंत पाटील आदिंनी मनोगतातून बबनराव खिल्लारे यांनी कर्तव्याच्या वेळेच्या पलीकडे जाऊन दिलेल्या सहकार्याची सविस्तरपणे मीमांसा केली.
याप्रसंगी शिवशंकर मखमले, सुहास भावसार, देविदास खिल्लारे, कुंवरसिंग चव्हाण, संदीप निलख, महेश सावजी, राजेंद्र पडघान, अशोक गवई, पुरुषोत्तम मानतकर, पवन शिंगणे, वृषाली मारके, शुभम वानखेडे, शेख चांद, लताबाई नागवे, सविता सुस्ते आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन व प्रास्ताविक रमेश दंदाले, आभार दीपक नागरे यांनी व्यक्त केले.
उपाहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.