चोरीच्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला 14 विरुद्ध गुन्हा दाखल
आठ ताब्यात तर सहा फरार
सिंदखेड राजा बीबी येथील शेख रियास शेख सुभान यांनी एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे मालकी च्या बकऱ्या अंदाजे किंमत एकावन्न हजार रुपये च्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन बीबी येथे दाखल केली होती सदर चोरटे पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या वरून पोलिसांनी काल 13 में रोजी खापर खेड घुले येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर 14 जणांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यानंतर अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ पाचारण करून ठाणेदार एल डी तावडे यांनी आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असता आज दि 14 मे रोजी त्यांना न्यायालयात उभे केले दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे
याबाबत असे की बीबी येथील शेख रियाज शेख सुभान यांनी दि 20 एप्रिल रोजी त्यांच्या मालकीच्या अंदाजे 51 हजार रुपयांच्या बकऱ्या चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली त्यावरून पोलिसांनी अ क्र 73/21 कलम 379 भा द वि प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता सदर बकरी चोर हे बीबी हद्दीतील खापरखेड घुले येथील असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार बिबी ठाणेदार एल डी तावरे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम व्यवहारे व पोलीस पथक खापरखेड घुले येथे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी काल दिनांक 13 मे रोजी गेले असता आरोपी गणेश संतोष राठोड संतोष विष्णू राठोड काळू चंदु राठोड गजानन विष्णू राठोड चंदू रामचंद्र चव्हाण बाळू राठोड रामनारायण दिगंबर चव्हाण दीपक सुरेश राठोड सुरेश अंकुश डोंगरे ज्ञानेश्वर मोहन राठोड सौ ज्योती चंदु राठोड सौ मीना सुभाष चव्हाण विलास चव्हाण यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात संदर्भाने शासन नियमाचे उल्लंघन केले म्हणून वरील आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन चे अंमलदार पो ना अर्जुन सांगळे यांचे फिर्यादीवरून अप न 87/21 कलम 353 332 143 147 148 149 224 225 188 269 270 अशा विविध भा द वि सह कलम 3 साथरोग अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून ठाणेदार एल डी तावरे यांनी अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ पाचारण करून पोलिसांचा ताफा घेऊन खापरखेडा घुले येथे जाऊन 14 आरोपी पैकी संतोष राठोड दीपक राठोड राम चव्हाण सुरेश डोंगरे चंदू चव्हाण ज्ञानेश्वर राठोड सौ लिलाबाई चव्हाण ज्योती चव्हाण या आरोपींना अटक करून आज दि 14 मे रोजी न्यायालयात उभे करून दोन दिवसाची पोलीस कोठडी घेतली आहे तर विलास चव्हाण राजू राठोड गणेश राठोड सुनील राठोड गजानन राठोड पूजा चव्हाण हे सहा आरोपी फरार आहे अधिक तपास ठाणेदार एल डी तावरे, पो कां सुभाष गीते, अर्जुन सांगळे, टेकाळे, मोहम्मद परशुवाले, पंडित नागरे, नायमाने, हे करीत आहेत