बुलडाणा,दि. २८ : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2505 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2504 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील एका अहवालाचा समावेश आहे.
निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 634 तर रॅपिड टेस्टमधील 1870 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2504 अहवाल निगेटीव्ह आहेत. पॉझीटीव्ह आलेला अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर : डी.पि.रोड 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात 01 नवीन रूग्ण आढळला आहे. तसेच आजपर्यंत 633762 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 86552 आहे. आज रोजी 1504 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 633762 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87247 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 86552 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत कोविडचे 23 सक्रीय रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.