सिंदखेड राजा – स्वराज्य जननी माँ जिजाऊ साहेबांच्या माहेरी राजे लाखोजीराव जाधव यांच्या सिंदखेड राजा नगरीत ऐतिहासिक मोती तलाव या तलावाच्या मधोमध छत्रपती शिवराय यांचा भगवा ध्वज उभारण्यात आला. हा ध्वज उभारण्याचा संकल्प सिंदखेड राजा नगरीतील युवकांनी पुढाकार घेऊन व परिश्रम करून उभारला .
हा भगवा ध्वज उभारण्यासाठी सिंदखेड राजा येथील विजय तायडे , अँड संदीप मेहेत्रे ,गजानन मेहेत्रे ,नामदेव खांडेभराड ,रवी ढवळे व शहाजी चौधरी यांनी पुढाकार घेऊन हा ध्वज बसविण्याचे काम केले व हा मोती तलावाच्या मधोमध बसवलेला ध्वज बसवल्यानंतर डोलाने तलावांमध्ये फडकत आहे हा ध्वज बसविण्याच्या कामा करता मंगेश खुरपे ,संजय मेहेत्रे ,नंदू खांडेभराड ,चंद्रकांत चौधरी , आकाश मेहेत्रे , सुरेश खांडेभराड , दीपक माघाडे ,किरण राजपूत ,संघदीप मस्के ,विकास जाधव , किरण मेहेर या सर्व सहकाऱ्यांनी त्यांना मदत केली . हा ध्वज बसवण्याच्या या कार्याची प्रशंसा परिसरातूनच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रभरातून शिवप्रेमी करत आहे व या युवकांच्या कार्याचे कौतुक होत आहे .