प्रतिनिधी सचिन मांटे – मुंबई नागपूर हाई स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक विषयाबाबत माहिती , जनमत व सार्वजनिक सल्ला मसलती बाबत बुलढाणा जिल्याचे जिल्हाधिकारी ,अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे २२ जुलै २०२१ रोजी बैठक पार पडली या बैठकीत प्रस्थावित प्रकल्प त्याची गरज व बाधित गावे व क्षेत्र यावर माहिती देण्यात आली .
मुंबई नागपूर याच्यासह कॉरिडॉरचा संक्षिप्त परिचय
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ला रेल्वे मंत्रालयाने सात हाई स्पीड रेल कॉरिडॉर साठी डीपीआर तयार करण्याचे अधिकार दिले आहेत. प्रस्तावित मुंबई नागपूर याच्यासारखा कॉरिडॉर हा दुसरा एचएसआर प्रकल्प आहे जो मुंबई-अहमदाबाद हाई स्पीड रेल कॉरिडॉर नंतर मुंबईहून सुरू होईल मुंबईहून नागपूर कडे जाताना एम एन एच एस आर हा प्रकल्प महाराष्ट्र राज्याच्या ठाणे नाशिक अहमदनगर औरंगाबाद जालना बुलढाणा वाशीम अमरावती वर्धा आणि अखेर नागपूर अशा दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे
ह्या प्रकल्पाची सरेखा मुख्यता महाराष्ट्र समृद्धी महामार्ग समृद्धी कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणा-या नागपुर मुंबई सुपर कमुनिकेशन एक्स्प्रेसवे च्या बरोबरीने असणार आहे या प्रकल्पामध्ये येणारी जमीन ही मुख्यत्वे शेतजमीन काळे चिकन माती नापीक जमीन तसेच हिरवळ विरहित आढळून येते प्रस्तावित प्रकल्पाच्या रचनेमध्ये उंच पूल भुयारी मार्ग यांचा समावेश आहे.
प्रकल्पाची पार्श्वभूमी
प्रस्तावित मुंबई नागपुर हाई स्पीड रेल कॉरिडॉर हा प्रमुख द्रुतगती महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ग्रीनफिल्ड भागांमध्ये नियोजित आहे मुंबई नागपूर बुलेट ट्रेन च्या प्रस्तावित योजनेत मुंबई शहराला नागपूर खापरी हद्दपार वर्धा कारंजा लाड मालेगाव जहांगिर मेहकर जालना औरंगाबाद शिर्डी नाशिक इगतपुरी शहापूर यासारख्या शहरांशी जोडण्यात येणार आहे सदर प्रकल्प ठाणे शहापूर एच एस आर घोटी बुद्रुक नाशिक शिर्डी औरंगाबाद जालना मेकर मालेगाव जहांगिर कारंजा लाड पुलगाव वर्धा अंजनी महाराष्ट्राला जोडले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील याच्यासाठी स्टेशन मेहकर एचएसआर स्टेशन 295 पॉईंट दोनशे किलोमीटर यात प्रस्तावित स्टेशन ठाणे शहापूर घोटी बुद्रुक नाशिक शिर्डी औरंगाबाद जालना मेहकर मालेगाव जहांगीर कारंजा लाड पुलगाव वर्धा खापरी अजनी
प्रकल्पाची गरज
रस्त्याने मुंबई आणि नागपूर दरम्यान अंतर 844 किलोमीटर विमानाने मुंबई ते नागपूर दरम्यान अंतर 688 किलोमीटर रेल्वे मार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान अंतर 833 किलोमीटर सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाची देखभाल बऱ्याच ठिकाणी केली जात नाही या व्यतिरिक्त सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाने प्रवासाला वेळ अधिक लागतो आहे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि वेगवान सुरक्षित दळणवळण साधून विदर्भ व मराठवाडा या कमी विकसित विभागाला अधिक समृद्ध बनविणे या प्रकल्पाचे मुंबई आणि नागपूर दरम्यान चे प्रवासातील कालावधी कमी करणे नाशिक जालना-औरंगाबाद यासारख्या अन्य मध्यवर्ती शहरांमधील वाहतुकीचे प्रमाण कमी करणे सर्वसामान्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे व लोकांची आर्थिक स्थिती सुधारणे प्रकल्प क्षेत्रात विद्यमान पायाभूत सुविधा आणि औद्योगिक घडामोडींना चालना दिली जाईल आणि स्थानिक रोजगार उपलब्ध करून देऊन आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला पाठिंबा देऊन देशातील मूल्य वाढेल.
या प्रकल्पाचे फायदे
मुंबई नागपूर दरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करून त्यावर बुलेट ट्रेन चालविल्यास नागपूर मुंबई अंतर केवळ तीन तासात कापता येणार आहे महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठा जसे मुंबई नागपूर औरंगाबाद प्रस्तावित मार्गाच्या ग्रामीण भागाची जोडणे औद्योगिक क्षेत्र तंत्रज्ञान क्षेत्र स्मार्ट सिटी कृषीआधारीत उद्योग असे उद्योग पर्यटन तसेच शैक्षणिक क्षेत्रात अधिक वेगवान गतीने विकसित व समृद्ध करता येतील याचा सामाजिक दृष्ट्या खूप फायदा होईल बांधकाम उद्योगाला चालना रेल्वेची तांत्रिक वाढ मजबूत पायाभूत सुविधांचा विकास तात्पुरते आणि कायमस्वरूपी रोजगार निर्मिती अधिक कार्यक्षम वाहतुकीमुळे ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी होते स्थानके अधिक टिकाऊ बनवण्यासाठी ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर शहरी रस्ते दुरुस्ती साठी आवश्यक असणारी कपात त्यामुळे पालिकेच्या बचत मध्ये बजेटमध्ये बचत होते वाहनांचा वेग कमी झाल्यामुळे हवेच्या गुणवत्तेत आणि धनी पातळीत सुधारणा होईल एम एन एच एस आर कॉरिडॉर बाजूने औद्योगिक उपक्रमांना चालना ज्यामुळे रोजगारांच्या संधी मध्ये वाढ होईल लांब पल्ल्याचा प्रवास सुकर होईल.
बुलढाणा जिल्ह्यातील बाधित होणाऱ्या गावांची यादी – यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील गावांची संख्या 47 प्लॉट संख्या 449 क्षेत्र 18.00 हे. सरकारी व इतर प्लॉट संख्या 729 हे. 134 लोकसंख्या एकूण लोकसंख्या अकराशे 78 आणि क्षेत्र 152 हे. मेहकर तालुका– बळेगाव, घोडेगाव ,डोणगाव, औंध रोड, अंजनी बुद्रुक, शहापूर, पिंपरी माळी, साबरा ,फैजलापुर, गवंढाळा ,कल्याणा, किरण गवळी, मेहकर, बाभुळखेडा, सेनगाव ,वरताळा ,शिवपुरी ,पारडा लोणार तालुक्यातील -बंदा ,अंजनी ,अंजनी खुर्द ,गुंजाळ ,खळेगाव , मंढवा, सिंदखेड राजा तालुक्यातील– सावरगाव माळ, देऊळगाव कोळ, कुंबेफळ, दुसरबीड, तळेगाव ,हिवरखेड ,किनगावराजा ,शेलगाव राऊत ,पिंपळगाव लेंडी ,पळसखेड चक्का ,जळगाव ,पिंपळकोटा ,देऊळगाव राजा तालुक्यातील जामखेड, पळसखेड झाल्टा ,तुळजापूर ,गोळेगाव.