दिनांक 21 जुलै मध्यरात्री झालेल्या पावसानंतर 22 जुलै रोजी सकाळी परिसरातील सूनगाव सह जळगाव जा तालुक्यात कपाशी सोयाबीन व इतर सर्वत्र पिकावर झालेल्या पावसामुळे पांढऱ्या रंगाचे ठिपके पिकावर आढळून आले जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरासह तालुक्यातील शेतकरी भयभीत झाले जळगाव जामोद तालुक्यात पेरणीच्या वेळी पावसाने अचानक दांडी मारल्याने परिसरात दुबार पेरणीचे संकट ओढवले होते व त्यानुसार दुबार तीबार पेरणी झाली परंतु सात ते आठ दिवसानंतर झालेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे तरी काल झालेल्या पावसामुळे परिसरात पिकांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके आढळून आले हे ठिपके पावसामुळेच पडलेले आहे असे
शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा येथे तालुका कृषी अधिकारी वाकोडे यांनी कपाशी पिकाच्या शेतात जाऊन पाहणी केली व कपाशी पिकाचे काही पाने व झाडे गोळा करून ती कृषितज्ज्ञ यांच्याकडे पाठविण्यात आले या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे निसर्गाकडून काहीतरी रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे परंतु या पांढऱ्या रंगाच्या ठिपक्यांमुळे पिकांवर काही दुष्परिणाम होणार का ही भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे तालुका कृशी अधिकारी यांनी शेतकाऱ्यांसोबत चर्चा करतांना सांगितले