ओबीसी अधिकारी कर्मचारी फेडरेशन महाराष्ट्र यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना निवेदन…
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित NEET मधील OBC चे आरक्षण शून्य करण्याच्या षडयंत्रा विरोधात व ओबीसींचे पदोन्नती मधील आरक्षण पुर्ववत करण्यात यावे. या मागण्यांसाठी ओबीसी अधिकारी कर्मचारी फेडरेशन च्या माध्यमातून आज दि. 20 जुलै रोजी मंगळवारला मा.उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
नोकरीतील पदोन्नती आरक्षण पुर्ववत करणे व शिक्षणातील आरक्षण हा OBC चा संविधानीक मूलभूत अधिकार आहे याच मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून आजपर्यत OBC ना NEET मध्ये आरक्षण मिळत होते , परंतु केंद्र शासनाच्या आरक्षण विरोधी भूमिकेमुळे OBC चे NEET मधील आरक्षण शून्य झाले आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात OBC विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे स्वप्न हे कधीही पूर्ण होणार नाही अशी परिस्थिती या मनुवादी केंद्र सरकारने निर्माण केली आहे .त्यामुळे या केंद्र सरकारच्या आरक्षण विरोधी निर्णयाच्या विरोधात ओबीसी अधिकारी कर्मचारी फेडरेशन शाखा सिंदखेडराजा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांना आज निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना मा.नंदकिशोर खरात- ( तालुकाध्यक्ष सिंदखेडराजा), मा.डॉ.भिमराव म्हस्के,मा. डॉ डि. यु मेहेत्रे, मा. रामदास मेहेत्रे,मौर्य आकाश मेहेत्रे सर,मा. दत्तात्रय खरात सर, मा.रंजनराव केळकर सर,मा.एकनाथ मेहेत्रे सर, मा.अमोल केळकर ,मा. गणेश मेहेत्रे सर,मा. पत्रकार गजानन मेहेत्रे, मा.सतिश सातपुते, मा.पत्रकार एल.डी.जाधव,मा.अमोल भट सर, मा. दिपक साळवे, मा.ठकाजी तिडके,मा.रोहीत म्हस्के, मा.विजय रंगनाथ तायडे हे उपस्थित होते .